शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आमटेंकडून रुग्णांना पुनर्जिवनासह पुनर्वसन

By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST

नरेंद्र नायडू : सावंतवाडीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात ‘समाजसेवा’ विषयावर व्याख्यान

सावंतवाडी : ‘भीतीवर प्रीतीची जीत व्हावी’ या आगळ्यावेगळ्या प्रेरणेतून बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली व कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन प्रकल्पाला ‘कुष्ठनिवास’ वा ‘करुणालय’ नाव न देता ‘आनंदवन’ हे काव्यमय नाव दिले आहे. बाबा आमटेंनी व त्यांच्या परिवाराने फक्त कुष्ठरुग्णांचे रोगोपचार न करता त्यांचे पुनर्वसनासोबत त्यांना विविध मार्गांनी स्वावलंबी बनवून त्यांना पुनर्जिवन प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन नरेंद्र नायडू यांनी केले. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ या प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र नायडू, महाविद्यालयाचे प्राचार्य विकास कठाणे, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, डॉ. दीपक तुपकर, ज्येष्ठ अध्यापक डॉ. सुहास नायडू, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, आदी उपस्थित होते. अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, आदी पीडितांना निरपेक्ष मदतीचा हात दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा त्यांची मुले डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे हे ‘आनंदवन’ ‘हेमलकसा’ व ‘सोमनाथ’, आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पुढे चालवत आहेत, असे नरेंद्र नायडू यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन गावडे, प्रास्ताविक डॉ. राजेंद्र पाटील यांंनी केले. डॉ. विकास कठाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल काटकर, भार्गवी लक्काकुला, योगेश ताजणे, अक्षय मोरे, श्रीराज केसकर, नुरसबा अन्सारी, गजाला मुजावर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आयुर्वेद महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा करीत असतानाच समाजसेवेचे व्रत अंगीकारावे. - नरेंद्र नायडू