शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सेवा बंद झाल्यास परतावा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:09 IST

सिंधुदुर्गातील ग्राहक संरक्षण बैठकीत मागणी

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १९ : भारत संचार निगम लिमिटेड मार्फत ग्राहकांना इंटरनेट सेवा दिली जाते. तथापि हा महिन्याचा प्लॉन असतो व महिन्यातील काही दिवस इंटरनेट सेवा मिळत नसते. तांत्रिक कारणास्तव बंद असते या बंद सेवेबाबत भारत संचार निगम लिमिटेड मार्फत परतावा किंवा बंद दिवसाप्रमाणे पुढील महिन्यात तेवढे दिवस सेवा देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जुना डी.पी.डी.सी. हॉल मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत अशासकीय सदस्यांची यादी ही तालुकास्तरावरील तहसील कार्यालय व इतर कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. जेणेकरुन सेवा घेण्या-या ग्राहकांची जर फसवणूक झाली तर त्यांना अशासकीय सदस्यांकडे तक्रार करता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. तरी वीज पुरवठा सुरळीत चालु ठेवावा. वीज वितरण कार्यालयांनी आपत्कालीन दुरध्वनी क्रमांक २४ तास सुरु ठेवावा. वीज देयकावर आपतकालीन यंत्रणाचा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा. जिल्ह्यातील नोंदणी नसलेल्या अनधिकृत हॉटेल व्यावसायीकांवर कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजुला छोटे हॉटेल व्यवसायीक हे कर्मशिअल गॅस सिलेंडर न वापरता घरगुती सिलेंडर सरासपणे वापरताना दिसतात. याबाबत तपासणी करावी. स्वतंत्र पथक स्थापन करुन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करावी.प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोनचाकी, चारचाकी वाहनाचा परवाना तसेच गाडी तपासणी इ. कामे करताना सर्व साधारण जनतेला त्रास सहन करावा लागतो. वेळेवर परवाने दिले जात नाही. जर परवानाचे कामे एजटांमार्फत केले तर वेळेवर होतात. प्रादेशिक परीवहन विभागाच्या आवारातील एजटांमार्फत चालविलेली कामे ही बंद करावी. परवाना संबंधी माहिती देण्यासाठी प्रादेशिक विभागानी एखाद्या संपर्क अधिकारी नेमावा. अशी मागण्या ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. या बैठकीस अशासकीय सदस्य सुभाष गोवेकर, नकुल पार्सेकर, विनायक पराडकर, एस. के. बांबुळकर, डॉ. राजेश नवांगुळकर, डॉ. मिलींद बोर्डवेकर, जगन्नाथ वळंजू, स्वप्नील नाईक, गुरुनाथ मडवळ, नंदकिशोर करावडे, नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर उपस्थित होते.