शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लिलावामुळे जुन्या गाड्यांतील पार्टस्चा पुनर्वापर

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : एका गाडीचे मिळतात सुमारे दोन लाख रुपये

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -‘एस. टी.’चे आयुर्मान दहा वर्षे निश्चित करण्यात आले आहे. कोणतीही गाडी भंगारात काढण्यापूर्वी तिचे करण्यात आलेले रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. भंगारात विकलेली गाडीसुध्दा जशीच्या तशी कधीच वापरात आणली जात नाही. गाडीतील चांगल्या पार्ट्सचा पुनर्वापर केला जातो. साधारणत: एका गाडीचे दोन लाख रूपये मिळतात.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एस. टी.च्या गाड्या निर्लेखित करण्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. महामंडळाच्या एकूण ३१ विभागांमध्ये निर्लेखन प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालयाकडून निश्चित केला जातो. वर्षातून एकदा लिलाव प्रक्रिया होते. मध्यवर्ती कार्यालयाकडून निर्लेखित करण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या मागवण्यात येते. लिलावाची तारीख निश्चित झाल्यानंतर संबंधित गाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येते. त्यानंतर गाडीतील चांगले पार्ट्स बाजूला काढले जातात.लिलाव प्रक्रिया ई-प्रणालीव्दारे होत असली तरीही प्रक्रिया राबवण्यासाठी महामंडळाकडून एका संस्थेला नियुक्त केले जाते. त्या संस्थेकडून लिलाव जाहीर झाल्यानंतर ठेकेदार आपापला माणूस पाठवून लिलावातील गाड्या पाहून आकडे नमूद करतात. प्रत्येक विभागाकडून लिलावातून किती रूपये मिळतील, यांचा अंदाज केलेला असतो, त्यानुसार अधिक पैसे देणाऱ्याला गाड्या विकल्या जातात. लिलाव प्रक्रिया विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते. गाड्या भंगारात काढल्या जातात, त्यावेळी एस. टी.च्या ताफ्यातील कमी झालेल्या गाड्यांची संख्या भरून काढण्यासाठी नवीन गाड्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पुरविल्या जातात. महामंडळ दरवर्षी नवीन गाड्यांची मागणी नोंदवते, त्यानंतर त्या गाड्यांची बांधणी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये केली जाते. गाड्या बांधणीनंतर त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतात. एखादी गाडी भंगारात काढण्यात आली असेल, परंतु गाडी वापरण्यास योग्य असेल तर संबंधित गाडीचा वापर करण्यात येतो. गाडीचे आयुर्मान शिल्लक असताना मोठा अपघात घडला व त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले असेल तर मात्र ती गाडी भंगारात काढली जाते. अन्यथा गाडीचे नूतनीकरण करून गाडी वापरात आणली जाते. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी ठरलेली एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीद असलेल्या एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांची सुरक्षितता जपली जाते. ५६ ते ६० प्रवासी घेऊन प्रवास करीत असताना अपघात होऊ नये, याची काळजी घेतली जाते. प्रवाशांना गाडीत घेण्यापूर्वीच चालक तपासणी करूनच गाडी ताब्यात घेतो. म्हणूनच एस. टी.ला विशिष्ट आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे.