शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाचे पुनर्पंचनामे

By admin | Updated: January 7, 2016 00:54 IST

आंबा, काजू नुकसान : अद्याप शेतकरी भरपाईपासून वंचित

चिपळूण : फेब्रुवारी व मार्च २०१५मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश वाटप करताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन, ज्या खातेदारांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्पंचनामे करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. ज्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अथवा त्यांच्या हिश्श्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ते प्रत्यक्ष वहिवाट करत असल्याची खात्री होण्यासाठी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत या काळात वस्तुस्थितीदर्शक पंचनामे सुरु आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच व वहिवाटदार यांच्या उपस्थितीत हे पंचनामे करुन यादी तयार केली जाणार आहे. दि. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या यादीचे वाचन होईल. दि. १६ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंतच्या यादीवरुन प्रत्येक गावच्या मंडल अधिकारी कार्यालयात हरकती घेतल्या जातील. दि. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मंडल अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने प्राप्त हरकतींवर सुनावणी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. दि. ९ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी तयार केली जाणार असून, ही यादी तहसीलदार कार्यालयात जमा केली जाईल. याबाबतचे पत्र सर्व ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक यांना तहसीलदार कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूचे नुकसान झाल्याने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, ही भरपाई देताना शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती नसणे, आधार कार्ड नसणे, बँक खात्याचे नंबर चुकीचे देणे, एकाच सातबाऱ्यावर अनेकांची नावे असणे यामुळे शेतकरी नुकसानापासून वंचित असल्याचे दिसून आले. नुकसान भरपाई देताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेकजण नुकसानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नव्याने पुनर्पंचनामे करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)पारदर्शक पंचनामे : वाटपात अडचणीनुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी शासनाची धारणा आहे. त्यामुळे नुकसान वाटपात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नुकसानाचे पुनर्पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पारदर्शकपणे हे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.