कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या महसूल वसुली मोहिमेला यश आल्याची माहिती नगरपंचायतीकडून गुरुवारी देण्यात आली.नगरपंचायतीने थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज आणि बॅनर चौकाचौकात लावले होते. भाजी मंडईतील गाळेधारकांकडून चार लाखांहून अधिक रक्कमेची वसुली करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनीही थकबाकी जमा करण्यासाठी धावाधा सुरु केली आहे. २२ मार्चपर्यंत मागील वर्षापेक्षा जास्त महसूल वसूल झाल्याची माहिती नगरपचायतीच्या सूत्रांनी दिली आहे.
कणकवली भाजी मंडईतील गाळेधारकांकडून चार लाखावर वसुली
By admin | Updated: March 23, 2017 16:30 IST