शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:47 IST

१४ वा वित्त आयोग : पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण २१ कोटी जमा

सिंधुदुर्गनगरी : १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर असलेल्या निधीतील दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाकडून १0 कोटी ४ लाख रूपयांचा निधी जिल्हा वित्त विभागाला प्राप्त झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण २१ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असून पहिल्या टप्प्यातील १0 कोटी ९६ लाख रूपयांचा निधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी बोलताना दिली.या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाला मंजुरी दिल्याने १३ व्या वित्त आयोगाचा निधी जवळ-जवळ १00 टक्के खर्ची होणार आहे. यापूर्वी वित्त आयोगाच्या निधी वित्त विभागाला प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी वितरीत केला जात असे. मात्र, १४ वा वित्त आयोग लागू झाला आणि निधी वाटपाचे निकषच बदलले. प्राप्त होणारा कोट्यवधींचा निधी वित्त विभागामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना वर्ग न करता तो निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग करताना त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर व क्षेत्रफळावर निधी वर्ग केला जात आहे. डिसेंबर २0१५ मध्ये शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १0 कोटी ९६ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. हा सर्व निधी ग्रामपंचायतीचा ९0 टक्के लोकसंख्येवर १0 टक्के क्षेत्रफळाच्या आधारावर वर्ग करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील १0 कोटी ४ लाखाचा निधी प्राप्त झाला असून या निधीच्या वाटपासंदर्भात शासन स्तरावर मार्गदर्शक सूचना नसल्याने तूर्तास हा निधी सर्व ग्रामपंचायतींना वर्ग होणे बाकी आहे. शासनाकडून मार्गदर्शन आल्यास तत्काळ हा निधी वर्ग केला जाणार असल्याचे वित्त अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)१३ वा वित्त आयोग : निधी १00 टक्के खर्च जिल्हा परिषदेला गतवर्षी प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या कोट्यवधीच्या निधीला दोन वेळा शासनाकडून मुदत वाढ देण्यात आली होती. आता याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. यातील एकही पैसा शासनास परत जाणार नसून १00 टक्के निधी खर्च होणार असल्याचे वित्त अधिकाऱ्यांनी सांगितले.