शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

'एलईडी'साठी तीन कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

मालवण पालिका विशेष सभा : शहरात १ हजार ८६४ दिवे बसविण्यात येणार

मालवण : गेल्या कित्येक वर्षापासून मालवण शहराला स्ट्रीटलाईटची समस्या भेडसावत आहे. शहरातील स्ट्रीटलाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी पालिकेला तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील १ कोटी ३५ लाख रुपयाच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उर्वरित २ कोटी १५ लाख रुपयांची कामे सुचविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली. शहरात १ हजार ८६४ दिवे बसविण्यात येणार असून हे दिवे ४० वॅटचे असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. नगरसेवक नितीन वाळके यांनी स्थानिक ठेकेदाराला एलईडी बसविण्याचा ठेका देण्यात यावा. जेणेकडून दुरुस्ती करावयाची झाल्यास सोपे पडेल. तसेच एलईडी दर्जेदार निकषावर खरेदी केली जावी अशी सूचना केली. तर सुदेश आचरेकर यांनी एलईडीच्या देखभालीबाबत प्रशासनाने सुरक्षा, खबरदारी घ्यावी, असे सांगितले.मालवण पालिकेची विशेष सभा मंगळवारी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, दीपक पाटकर, जॉन नऱ्होना, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, नितीन वाळके, रविकिरण आपटे, स्नेहा आचरेकर, ममता वराडकर, संतोषी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, रेजिना डिसोजा, शीला गिरकर, पूजा करलकर, सेजल परब उपस्थित होते. मालवण शहरातील रस्ते तसेच विविध विकासकामांच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेवरून सभागृहात चांगलीच चर्चा रंगली. यावेळी महेंद्र म्हाडगुत यांनी वाढीव खर्चास थेट मान्यता देण्याबाबत आक्षेप घेत मंजुरी कोणत्या आधारावर द्यायची असा सवाल उपस्थित केला. यावर आचरेकर यांनी त्यांच्या मताला दुजोरा देत मंजुरीची आकडेवारी ढोबळ आहे. कामांचा वाढीव खर्च कशा पद्धतीने दाखविण्यात आला हे समजणे गरजेचे आहे, असे सांगताना शहरातील विकासकामे दर्जेदार झाली आहेत. मात्र वाढीव कामाच्या मंजुरीची पडताळणी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. याला नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व नितीन वाळके यांनी सहमती दर्शविली. भुयारी योजनेनंतर शहरात दर्जात्मक रस्ते झाले आहेत. मात्र काही ठिकाणी चेंबर लगतचे रस्ते खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर डांबरीकरणाबाबत खर्चाची तरतूद करण्यात यावी, असे वाळके यांनी सुचित केले. तर रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण झाल्याने आचरेकर यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सहकारी नगरसेवक व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)