शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खरी कला दशावतारातच

By admin | Updated: June 28, 2016 00:33 IST

समीरा गुजर : कुडाळ येथील मान्सून महोत्सवाचा दुसरा दिवस

कुडाळ : कलाकार म्हणून आम्हाला जरा प्रसिध्दी मिळाली की, पुण्या मुंबईचे आम्ही कलाकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो मात्र खरी कला या कोकणातील दशावतार नाट्यकलेत आहे. ही कला मी जगभरात नेऊ शकले तर खऱ्या अर्थाने या मातीचे ऋण फेडले असे मानेन, असे प्रतिपादन अभिनेत्री समीरा गुजर यांनी चौथ्या मान्सून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘अश्विनी उद्धार’ हे संयुक्त दशावतार नाटक पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या या चौथ्या मान्सून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री समीरा गुजर व पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक गणेश भोगटे, एजाज नाईक, चेतन पडते, बबन राऊळ, सदानंद अणावकर, राजा सामंत, अनिल खुडपकर, अमोल राणे, राजू गवंडे, यशवंत तेंडोलकर, बाबा मयेकर, राजेश म्हाडेश्वर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सचिन पवार म्हणाले की, लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने कुडाळ येथे आयोजित मान्सून महोत्सव हा कौतुकास्पद असून, हा ग्रुप दशावतार कला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ईशा गोडकरने बहारदार नृत्य सादर केले. त्यानंतर ‘अश्विनी उद्धार’ हे संयुक्त दशावतार नाटक सादर झाले. दुसऱ्या दिवशीही गर्दीचा उच्चांक पहिल्या दिवशी मान्सून महोत्सवाला रेकॉर्ड ब्रेक रसिक प्रेक्षकांची गर्दी होती. अशीच उच्चांकी गर्दी दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या ‘अश्विनी उद्धार’ दशावतार नाटक पहायला प्रेक्षकांनी केली होती. बसायला जागाच नसल्याने काही प्रेक्षकांनी उभे राहून, तर काहीनी थेट रंगमंचावरच बैठक ठोकत या नाटकाचा आस्वाद घेतला. या नाटकाने या चौथ्या महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लाजरी ग्रुपचे सदस्य व प्रेक्षक उपस्थित होते.