शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दुर्गंधीयुक्त जैविक कचरा

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विर्डी-तळेखोल परिसरातील प्रकार : गोवा व्यावसायिकांवरच संशय, ग्रामस्थांतून तीव्र संताप

वैभव साळकर - दोडामार्ग  -महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी-तळेखोल रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात अज्ञांताकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा नजीकच्या गोवा राज्यातून आणून टाकला जात असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. गोव्यातील काही व्यावसायिकांना यापूर्वीही अशाच प्रकारे कचरा टाकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पुन्हा असे न करण्याबाबत समज दिली होती; पण वर्षभरानंतर पुन्हा कचरा टाकण्यासाठी गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांतूून संताप व्यक्तहोत आहे.दोडामार्ग तालुका गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर वसला आहे. याच तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेखोल-विर्डी गावचा गोव्यातील काही व्यावसायिकांकडून कचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. ही दोन्ही गावे गोवा राज्याच्या सीमेला लागूनच हाकेच्या अंतरावर असल्याने गोव्यातील कचरा अज्ञातांकडून आणून टाकण्याचे काम केले जात आहे. कचऱ्यात टाकाऊ जैविक वस्तूंचा जास्त समावेश आहे. त्यात सुया, इंजेक्शन्स तसेच काचेच्या बाटल्या व झोपण्याच्या गादीत वापरल्या जाणाऱ्या लगद्याचा समावेश आहे. शिवाय सिमेंटच्या पिशव्यांमध्ये जनावरांच्या शरीरावरील टाकाऊ मांस भरून त्या टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा गोव्यातूनच आल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.यापूर्वीही रात्रीच्या वेळी कचरा टाकताना ग्रामस्थांनी गोव्यातील काही व्यावसायिकांना रंगेहात पकडले होते. त्यावेळी त्यांना यापुढे कचरा न टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर कचरा टाकणे बंद होते; परंतु पुन्हा गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा कचऱ्यासाठी डंपिंंग ग्राऊंड म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे विर्डी-तळेखोल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्र्रशासनाची तारांबळ सुरू असल्याने बहुतांशी अधिकारी यामध्येच व्यस्त झाले आहेत; पण याचाच गैरफायदा घेत हा दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या प्रकारामुळे येथे नव्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.ग्रामस्थ ठेवणार पाळतगतवर्षी अशाच प्रकारे दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याच्या प्रकाराला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून संबंधित व्यावसायिकांना पुन्हा असे कृत्य न करण्यासाठी समज दिली होती.त्यानंतर हा प्रकार बंद झाला होता; पण पुन्हा येथे कचरा टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थ कचरा टाकणाऱ्यांवर आता पाळत ठेवणार असून रंगेहात पकडल्यानंतर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.