शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग बाजार समितीच्या सभापतिपदी रावराणे

By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST

उपसभापतिपदी राजन परब : दोन्ही पदे काँग्रेसकडेच; राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद नाही

 सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी तुळशीदास रावराणे, तर उपसभापतिपदी राजन परब यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना आपल्याला उपसभापतिपद न दिल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त करीत सभापती निवड ठिकाणावरून माघारी परतले.दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी दाजी खताळ यांनी सभापती व उपसभापतींच्या नावाची घोषणा करताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला तीन आणि अपक्षांना एक जागा मिळाली होती.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.४५ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दाजी खताळ यांनी संचालक मंडळाच्या बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचा विषय आल्यानंतर काँग्रेसच्या अरविंद रावराणे (संचालक) यांनी तुळशीदास रावराणे यांचे नाव सुचविले, तर या नावाला प्रकाश राणे यांनी अनुमोदन दिले. या नावाला कुणीही विरोध दर्शविला नसल्याने सभापतिपदी तुळशीदास रावराणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर उपसभापतिपदाचा विषय अजेंड्यावर येताच काँग्रेस गोटातील संचालक मंडळाकडून राजन परब यांचे नाव सुचविले. त्याला अनुमोदनही देण्यात आले. मात्र, त्याचक्षणी राष्ट्रवादीच्या संचालकांनी याला विरोध दर्शवत कृष्णा करलकर यांनी अवधूत रेगे यांचे नाव सुचविले. याला स्नेहल पाताडे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राजन परब व राष्ट्रवादीचे अवधूत रेगे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करून घेत निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीच्या अवधूत रेगे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने उपसभापती राजन परब यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. नावे जाहीर होताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्यासह काही पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत माघारी परतले. या निवडीवेळी काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख अशोक सावंत, विकास कुडाळकर, राकेश कांदे, सुभाष दळवी, विनायक अणावकर, मामा कसालकर, बाबू बालम, प्रवीण परब, दिनेश साळगावकर, शरद कर्ले, आदी उपस्थित होते. (प्रतिक्रिया)राष्ट्रवादीचे अवधूत रेगे यांनी उपसभापती पदासाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. याबद्दल रेगे यांचे अभिनंदन करतो. यापुढेही निवडणुका या आघाडी करूनच लढवू- अशोक सावंत, उपजिल्हाध्यक्ष,काँग्रेस सिंधुदुर्ग.काँग्रेसने आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपभापतिपद न दिल्याने आम्ही नाराज नाही. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली. या तत्त्वानुसार उपसभापतिपद राष्ट्रवादीला मिळणे गरजेचे होते.- व्हिक्टर डान्टस, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.प्राधिकरण क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीची दहा गुंठे जागा घेण्यात आली आहे. मार्केट यार्डसाठी २५ एकर जागा आरक्षित केली आहे. ओरोस येथे लवकरात लवकर मार्केट यार्डचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. - राजन परब, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग