शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

पाठपुराव्यामुळेच रत्नागिरीचे प्रश्न सुटले

By admin | Updated: December 30, 2015 00:44 IST

राजन साळवी : ‘लोकमत’ कार्यालयात मनमोकळी चर्चा

कोकणातील आंबा, काजू नुकसानभरपाई, मच्छिमारांच्या समस्या, आॅनलाईन सातबाराचा घोळ, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न, प्रकल्पासाठीचा लढा, एस. टी. स्थानकातील पानस्टॉल समस्या यांसारखे अनेक प्रश्न आक्रमकपणे मांडत आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेची बुलंद तोफ बनून विधीमंडळ अधिवेशने गाजवली. नागपूर अधिवेशनानंतर सोमवारी लोकमत कार्यालयाला भेट देऊन त्यांनी आपले अनुभव कथन केले. राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना रत्नागिरीसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विकासकामांसाठी हिरीरीने सरकार दरबारी लढणारे, विधिमंडळाच्या मुंबईतील व नागपूर हिवाळी अधिवेशनातही तितक्याच आक्रमकतेने जनतेच्या समस्या मांडून त्याबाबत निर्णय मिळवणारे, लोकांना न्याय देणारे आमदार राजन साळवी हे शिवसेनेची राज्यातील एक बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात. नागपूर अधिवेशनात त्यांनी रत्नागिरीच्या विविध समस्या आग्रहपूर्वक मांडल्या. समस्या सोडवण्यात यश मिळविलेल्या आमदार साळवी यांनी सोमवारी (२८ डिसेंबर २०१५) रत्नागिरीच्या ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली व विधिमंडळात मांडून सोडविलेल्या समस्यांबाबत संवाद साधला. प्रश्न : कोकणसाठी महत्त्वाच्या असलेल्या आंबा-काजू नुकसानभरपाईबाबत नेमके काय प्रयत्न केले ?उत्तर : गतवर्षीच्या हंगामात आंबा, काजूचे नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळण्यासाठी कोकणातील आमदारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र, सातबारावर अनेक वारसदार असल्याने कसणाऱ्याला भरपाई मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील चार जिल्ह्यांना शंभर कोटींची नुकसानभरपाई शासनाने मंजूर केली होती. मात्र, संमतीपत्राच्या वादात ही भरपाई अडकली अन् निधी परत जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर बागायतदारांची बाजू अधिवेशनात मांडली. मुख्यमंत्री देवें्रद फडणवीस यांनीही त्याला मान्यता दिली. आता हमीपत्रावर ही भरपाई वितरीत केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शासनादेश येईल. पाठपुरावा केला तर कामे होतात यावर माझा विश्वास आहे.प्रश्न : आॅनलाइन सातबाराबाबतही आपण भूमिका मांडली, नेमके काय निष्पन्न झाले? उत्तर : जिल्ह्यातही आॅनलाइन सातबारा योजना लागू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट नाही तर त्या लोकांना सातबारा मिळणार कसे? याकडे आपण अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील जनतेची ही गंभीर स्वरुपाची समस्या आहे, हे लक्षात घेऊन आॅनलाइन सातबारा मिळत नसेल तर हस्तलिखित स्वरुपात द्यावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा आदेश निघाला आहे. इंटरनेट नसलेल्या भागातील लोकांना याचा लाभ होणार आहे. प्रश्न : अन्य कोणत्या प्रश्नांवर आपण शासनाचे लक्ष वेधले व ते सोडविण्यात यश मिळविले ?उत्तर : पारंपरिक व पर्ससीन नेट मच्छिमारी ही ठरलेल्या अंतराच्या मर्यादेत व्हावी. पारंपरिक मच्छिमारांना त्याचा त्रास होता नये, याबाबतही योग्य निर्णय होणार आहे. एस. टी. स्टँडवरील पान स्टॉलवर थंड पेय, खाद्य, अन्य वस्तू विक्रीला परवानगी मिळवून घेतली. एस. टी. भरतीत नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र नसलेल्या विदर्भासह रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ जणांना न वगळण्याचा निर्णय झाला आहे. शासकीय सेवेतील ६० सुरक्षारक्षकांपैकी २३ जणाना शिक्षण, उंची छाती या मुद्द्यांवरून नोकरीतून न काढण्याचा निर्णयही आपल्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीचा धोका टळला आहे. मंत्रीपद मिळालेच तर क्षमता नक्की सिध्द करीनलाल दिवा काय आज असेल, उद्या नसेल... परंतु एक शिवसैनिक म्हणून सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मिळालेले आशीर्वाद, त्यांनी दिलेला विश्वास व उध्दवजींचे मिळत असलेले प्रेम यापेक्षा माझा मोठा सन्मान आणखी काय असू शकतो? हे आशीर्वाद व प्रेम माझ्यासाठी लाल दिव्याहून मोलाचे आहे. संघटनेत काम करीत असताना कोणाला मंत्रीपद द्यावे वा अन्य कोणते पद द्यावे, हा सर्वस्वी पक्षप्रमुख उध्दवजींचा अधिकार आहे. संघटनेत काम करताना आपल्याला मंत्रीपद मिळालेच तर त्या पदाला न्याय देण्यासाठी क्षमता नक्कीच सिध्द करीन. पक्षप्रमुख व संघटनेला अभिनान वाटावा, असे काम करीन. माझा विश्वास आहे, संघटनेत योग्यवेळी त्या त्या संैनिकाला पक्षप्रमुख नक्की संधी देतात. ती मागण्याची गरज अजिबात नाही, असे आमदार राजन साळवी म्हणाले. बाळासाहेबांनी दिलेली अंगठी...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सैनिक म्हणून विश्वास टाकल्यानंतर माझ्या सामाजिक कामात यश मिळावे म्हणून स्वत: देवाच्यासमोर उभे करून मला देवाच्या साक्षीने अंगठी दिली. ही अंगठी आजही माझ्या हातात मी जपली आहे. मला प्रेरणा देणारी ही अंगठी हा त्यांचा प्रेमळ सहवासच आहे.

 

- प्रकाश वराडकर