शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पॅटर्न राज्यभर राबविणार

By admin | Updated: February 12, 2016 23:50 IST

राम शिंदे : पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात घोषणा

रत्नागिरी : सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये सुरू केलेले स्वागत कक्ष, तसेच जिल्हा पोलीस दलाला पोलीसपाटील व पोलीस मित्र, सागररक्षक यांचे मिळणारे सहकार्य आदर्शवत आहे. त्यामुळे माणसातला पोलीस व पोलिसातला माणूस या रुपाचे खरेखुरे दर्शन आपल्याला या जिल्ह्यात झाले. पोलीस खात्याच्या उपक्रमाचा हा ‘रत्नागिरी पॅटर्न’ राज्यभरात राबवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज (शुक्रवारी) येथे केली. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित सागरी सुरक्षा जनजागृती पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरी विभाग तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक उमेश शेट्ये आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील १३ गावे दारूमुक्त करण्यात आली, ही बाब अत्यंत चांगली असून, जिल्हा पोलिसांच्या या कामगिरीची मंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक बुरडे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था ही प्रगती व विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वांनीच आम्हाला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा उपयोग केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात ६८७ सागररक्षक आहेत. १० संस्थांचे २०० लोक सागरी सुरक्षेसाठी बॅँ्रड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करीत आहेत. यावेळी जिल्हा पोलिसांना मदत करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविणाररत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासाला खूप वाव आहे. काही ठराविक भागांचा पर्यटन विकास झाला आहे. मात्र, शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन विकास होऊ शकतो. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा बनविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.