शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

रत्नागिरीला दरवर्षी ३00 कोटी देऊ

By admin | Updated: January 29, 2016 23:58 IST

चंद्रकांत पाटील : मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यांना जोडणार

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी हजार कोटी निधी देणे राज्य सरकारला शक्य नाही. मात्र, ३०० ते ४०० कोटी निधी रस्त्यांसाठी देता येईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चौपदरी होणारा मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यातील सहा, आठ पदरी महामार्गांशी जोडण्याचाही गडकरी यांचा विचार असल्याचेही चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले. निवळी - रत्नागिरी येथे चौपदरीकरणाच्या भूमिपूजन संमारंभात पाटील बोलत होते. राज्यात २० हजार किलोमीटर रस्त्यांची गरज आहे. त्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करून निधीची तरतूद करावी लागेल, असेही पाटील म्हणाले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याची मागणी आपण मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. आज चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले. येत्या महिना-दोन महिन्यात भूसंपादन होईल. चौपदरीकरण सुरू होईल. त्याच्या भूसंपादनासाठी कोठेही बळाचा वापर होणार नाही. कोकणच्या विकासाचा हा महामार्ग चौपदरी झालाच पाहिजे. त्याचबरोबर रेवस-रेडी हा ४७५ किलोमीटरचा सागरी महामार्गही झाला पाहिजे. हा सागरी महामार्ग राज्याने केंद्राकडे हस्तांतरीत करावा व त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गीते यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे केली. चौपदरीकरणाची सुरूवात रत्नागिरीतून होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. जिल्हा प्रशासनाचे उत्तम सहकार्य यासाठी मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला हा महामार्ग चौपदरीकरणानंतर आनंदी प्रवासाचा मार्ग ठरावा, अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील कामाच्या प्रगतीचे त्यांनी कौतुकही केले. पालकमंत्री वायकर म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी, दुरुस्तीसाठी ५ हजार कोटींची गरज आहे. दरवर्षाला १ हजार कोटी रुपये मिळाले तर रस्ते चांगले करता येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)