शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रत्नागिरी विभाग : एस. टी. महामंडळाला वावडे?

By admin | Updated: October 15, 2015 00:37 IST

तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्रास

मेहरुन नाकाडे-रत्नागिरी--प्रत्येक क्षेत्रात महिलावर्गाने आपले वर्चस्व स्थापित केले आहे. खासगी असो वा शासकीय क्षेत्रात पुरूषवर्गाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. राज्य परिवहन महामंडळामध्ये केवळ चालक वगळता अन्य सर्व पदांवर महिला कार्यरत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यापैकी विविध पदांवर ३१७ महिला काम करत आहेत. त्यामुळे महिलांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ ७.४ टक्के इतकीच आहे.एस. टी.मध्ये पाच सीटस् महिलांसाठी आरक्षित ठेवणाऱ्या एस. टी.च्या महामंडळात मात्र महिलांना नगण्यच स्थान असल्याचे दिसून येते. कारण केवळ ७.४ टक्केच महिलांना एस. टी. महामंडळाने सामावून घेतले आहे. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकपदी एक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक ४, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ३, वरिष्ठ कार्यादेशक १, वहातूक निरीक्षक १, भांडारपाल १, लेखाकार १, वरिष्ठ लिपीक/रोखपाल १०, लिपिक ७४, शिपाई ७, वाहतूक नियंत्रक १४, वाहक १४९, कारागीर ‘क’ २, सहाय्यक २१, स्वच्छक १२, सफाई कामगार ५ मिळून एकूण ३१२ महिला कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत.महिलांना ३३ टक्के आरक्षण शासनाने दिल्याने विविध क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. वर्ग १च्या अधिकारीपदापासून अगदी सफाई कामगार या पदावर महिला काम करतात. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, सचोटी या गुणांमुळे घर सांभाळून नोकरीतील जबाबदारी त्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत. महिलांना ५० टक्के जागा देण्याची मागणी आहे. जर महिलांना ५० टक्के जागा दिल्या तर प्रत्येक क्षेत्रात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्राससहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यत केवळ वाहक वगळता अन्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कामकाज करावे लागते. महिला वाहकांना रात्रवस्तीसाठी पाठवले जात नाही. त्यांना दिवसाची ड्युटी देण्यात येते. परंतु, पहाटे चार वाजलेपासून या महिलांना ड्युटीवर हजर व्हावे लागते. कौटूंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पहाटे घर सोडावे लागते. अनेकवेळा सलग आठ तास ड्युटी करावी लागते.चालकांच्या तुलनेत वाहकांची संख्या कमी असल्याने ओव्हरटाईम देखील करावा लागतो. अशावेळी अधिकची ड्युटी करून घरी पोहोचेपर्यत रात्र देखील होते. एकूणच तारेवरची कसरत करत या महिला कौटुंबिक व कार्यालयीन जबाबदारी सांभाळत आहेत.चालकपदी पुरुषचराज्य परिहवन महामंडळामध्ये चालक पदावर काम करण्यासाठी अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र, अवजड परवाना काढणाऱ्या महिलावर्गाची संख्या हातावर मोजण्याइतकीच आहे. अन्य राज्यात ही संख्या जास्त असली तरी महाराष्ट्रात ही संख्या अल्प आहे. त्यामुळे अद्याप तरी एस. टी.मध्ये चालक पदावर पुरूषवर्गाचीच मक्तेदारी राहिली आहे.रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत.विविध पदांवर केवळ ३१७ महिला.सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत.