शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभाग सज्ज

By admin | Updated: August 15, 2016 00:29 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. मुंबईहून कोकणात २२११ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर रत्नागिरीहून मुंबईकडे परतीसाठी २०१७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणला विशेष पसंती दिली जात आहे. मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. याशिवाय महामंडळाने मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण प्रक्रिया सुरू केल्याने प्रवाशांचा त्याकडे वाढता कल आहे. महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत राज्यातील अन्य जिल्ह्यातून चालक गाड्या घेऊन येत असतात, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. त्यामुळे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छता तसेच उपाहारगृहातून वाढीव खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. प्रत्येक आगारात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून वाहतूक नियोजनास त्याची मदत होणार आहे. एखाद्या गावातील प्रवाशांनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. १ तारखेपासून कोकणात गाड्या येणार आहेत. याशिवाय नियमितच्या ८० गाड्या रत्नागिरी विभागातून धावणार आहेत. मुंबई सेंट्रल, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणामुळे मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी १०पासून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)