शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रत्नागिरी होऊ शकते ‘स्मार्ट’

By admin | Updated: August 12, 2015 23:14 IST

नगर पालिका : केवळ अभ्यासपूर्ण आराखड्याची गरज...!-स्वप्न रत्नागिरीच्या विकासाचे-२

रत्नागिरी : इच्छा असेल तर मार्ग दिसेल, या उक्तीनुसार रत्नागिरीचे नाव देशातील १०० स्मार्ट शहरांच्या संभाव्य यादीत समाविष्ट झाले नसले तरी हे शहर स्मार्ट होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छा शक्ती आवश्यक आहे. नगरोत्थान व सुजल निर्मल योजनेतून शहर स्मार्ट करण्याचे काम आधीपासूनच सुरू झाले आहे. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी ५३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. डांबरीकरणासाठीही कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. अन्य विकासकामांसाठी अभ्यासपूर्ण विकास आराखडा राज्य शासनाला सादर केल्यास अन्य योजनांमधून ही कामेही होतील. त्यासाठी स्मार्ट शहर योजनेतच समावेश हवा, असा अट्टाहास धरण्याची आवश्यकता नसल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहर ‘ब’ वर्गातील नगर परिषद असून, जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७६,०५२ इतकी आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुविधांची उपलब्धताही वाढविण्याची आवश्यकता असल्याने आता शहर विविध सुविधांनी सक्षम बनवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अनेक विकासकामांचा पाठपुरावा सुरू आहे, तर अनेक विकासकामे पूर्णत्त्वास आली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्तेही आता डांबरीकरणामुळे गुळगुळीत झाले आहेत. रत्नागिरी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या तीन पाणी पुरवठा योजना आहेत. पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत शीळ पाणी पुरवठा ही योजना आहे. नाचणे पाणी पुरवठा योजनेतून शहराच्या काही भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु हा स्रोत मर्यादित आहे. पानवल पाणी पुरवठा योजनेतून सद्यस्थितीत मार्चच्या मध्यापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरण नगरपालिकेच्या मालकीचे असून, पानवल ते रत्नागिरी या दरम्यान कोणत्याही प्रकारे पंपिंग न करता गुरुत्वबलावर रत्नागिरीत पाणी आणले जाते. हे धरण १९६५ मध्ये उभारलेले आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याऐवजी आता नवीन धरण उभाण्याचे काम जलसंपदा खात्यातर्फे केले जाणार आहे. मात्र, सध्याची जुनी जलवाहिनी खराब झाल्याने ती सुजल योजनेच्या निधीतून पूर्णत: बदलली जाणार आहे. जीवन प्राधिकरण यामध्ये दुवा म्हणून काम करीत आहे. शहराची भविष्यकालीन २२ दशलक्ष घनमीटर प्रतिदिवस पाण्याची गरज लक्षात घेऊन पानवल धरणातून १६ एमएलडी पाणी जुलै ते जानेवारीपर्यंत शहराला पुरवावे व त्याच काळात ६ एमएलडी पाणी शीळ धरणातून घ्यावे, असा प्रस्ताव आहे. जानेवारी ते पावसाळा सुरू होईपर्यंत शीळ धरणातून १६ एमएलडी, तर पानवल धरणातून ६ एमएलडी पाणी घ्यावे, असा प्रस्ताव आहे. शीळ धरण ते साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असणारी जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार गळती होते. ही जलवाहिनी आता सुजल योजनेतून बदलली जाणार आहे. त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कमी दाबाने होणारी पाणीपुरवठ्याची समस्या दूर करता येईल. शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सुधारणा कार्यक्रम मंजूर केला. नगर परिषदेला त्यासाठी २ कोटी २२ लक्ष इतका निधी उपलब्ध करुन दिला. त्या सुधारणा कार्यक्रमांतर्गत पालिकेकडून विविध कामे हाती घेण्यात आली होती. ग्राहक सर्वेक्षण, जललेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, जलमापक यंत्र खरेदी करणे व बसविणे, हायड्रोलिक मॉडलिंग, जी. आय. एस. मॅपिंग, गळती शोध उपकरणे, सार्वजनिक नळ कोंडाळे ग्रुप कनेक्शनमध्ये रुपांतरीत करणे, जलवाहिन्यांवरील गळती काढणे, या कामांचा त्यात समावेश आहे. सर्वेक्षण कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (ऊ. ढ. फ.) शासनाकडे सादर करण्यात आला. शहराबाबत अनेक विकासकामांचा मुद्दा निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)परिपूर्ण प्रस्ताव महत्त्वाचेस्मार्ट शहराची संकल्पना गेल्या वर्षभरातील आहे. मात्र, त्याआधीच गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेत नगराध्यक्षपदी असलेले मिलिंद कीर यांनी शहर विकासाचा आराखडा तयार करून घेतला. भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा व्यवस्था, अन्य विकास योजनांबाबतचा हा दीडशे कोटींपेक्षा अधिक खर्चाचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार सुमारे ७० कोटींचा आराखडा मंजूर झाला. या योजनेनुसार काही कामे सुरू आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून रत्नागिरीतील कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविले तर त्यातून विकासकामांना निधी नक्की मिळू शकतो, हे स्पष्ट झाले. ‘ब’ वर्ग पालिकांसाठीही स्मार्ट शहर योजना : मयेकररत्नागिरी शहराची निवड ब वर्ग नगरपालिकांसाठी असलेल्या दुसऱ्या स्मार्ट शहर योजनेत व्हावी, यासाठी प्रयत्न असून, १३ आॅगस्टच्या सभेत याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा होईल. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. पहिल्या स्मार्ट शहर योजनेत रत्नागिरी शहराचा समावेश झाला नसला तरी या ब वर्ग योजनेत नक्की समावेश होईल. पहिल्या स्मार्ट शहर योजनेत समावेश झाला नसला तरी रत्नागिरी शहरात नगरोत्थान, सुजल-निर्मल व अन्य विविध योजनांमधून पाणीपुरवठा, रस्ते विकास यांसारख्या योजना राबवण्यात येत आहेत. प्रायोजक मिळाल्यास रत्नागिरीकरांना २४ तास अखंड पाणी पुरवठाही केला जाऊ शकतो.