शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रारंभ २६ रोजी?

By admin | Updated: October 16, 2015 00:01 IST

जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच.

रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचा प्रारंभ आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. या कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी २६ आॅक्टोबर २०१५ हा दिवस निश्चित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत दौरा जाहीर झाला नसल्याने याबाबत प्रशासन स्तरावरून गुप्तता पाळली जात आहे. या कार्यक्रमाबाबतची तयारी रत्नागिरीत सुरू झाली आहे. तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विस्तारीकरण असले, तरी या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे. मुंबई व गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान रत्नागिरी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. रत्नागिरीचा विस्तार होत असून, येथील औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर हा विमानतळ विस्तारित करून येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. रत्नागिरीच्या या विमानतळावरून काही वर्षांपूर्वी छोट्या (पान १ वरून)प्रवासी विमानांची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता स्थिती बदलली असून पुणे, मुंबई व गोवा येथे तत्काळ जाण्यासाठी उद्योजक व व्यावसायिक यांना रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू होणे महत्त्वाचे वाटते आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच. शिवाय विमानसेवा नसल्याने उद्योजक याठिकाणी येण्यास नाराज आहेत. याचा विचार करूनच शासनाने या विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) गडकरींचे सुतोवाच खरे ठरणार!काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरीत विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे गडकरी यांचे ते वक्तव्य विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने खरे ठरणार आहे. रनवे १८०० मीटर्सनी वाढणार... गोवा व मुंबई दरम्यान सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी तटरक्षक दलासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. तटरक्षक दलाच्या विमानांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे. राज्यात व देशातील अन्य काही ठिकाणचे विमानतळ तटरक्षक दलाकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, तेथून प्रवासी विमान वाहतूकही सुरू आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, असा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.