शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांचा बंद होणार

By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST

प्रशासनाला निवेदन : शासन धोरणाचा निषेध

रत्नागिरी : रेशन दुकानदार व केरोसीन वितरकांच्या समस्यांकडे शासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शासनाला जाग यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार आणि केरोसीन वितरक एकवटले असून, येत्या १ मे पासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.अन्न सुरक्षा विधेयकातील तरतुदीनुसार सुधारित धान्य वितरण प्रणालीमार्फत दुकानापर्यंत धान्य पोच मिळावे, तसेच गेली १० ते १२ वर्षे तात्पुरते परवाने देऊन विनातक्रार दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांना कायम परवाने मिळावेत, या प्रमुख मागण्यांसह शासन निर्णयानुसार धान्य दुकानदारांना वाहतूक रिबेट मिळत आहे. २००५पासून डिझेल दर वाढीनुसार वाहतूक रिबेटचा खर्च मिळावा. साखरेचे कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळावा. गेली कित्येक वर्षे रेशन दुकाने व केरोसीन परवाने तात्पुरते आहेत ते कायमस्वरूपी करण्यात यावेत, शालेय पोषण आहार, रोजगार हमी योजना यांची देयके त्वरित देण्यात यावीत. एपीएल धान्य कोटा पूर्ववत देण्यात यावा. रॉकेल कोटा वाढवून मिळावा. एफ. सी. आय.कडून मिळणाऱ्या धान्याची व बारदानाची प्रमाणित प्रत मिळावी, आदी संघटनेच्या मागण्या आहेत. ग्राहकांच्या गैरसोयीचा विचार करून आत्तापर्यंत रास्तदर धान्य दुकानदार आणि केरोसीन वितरक यांनी सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. २८ फेब्रुवारी चालक - मालक संघटनेने प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. २ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व रास्तदर धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मात्र, याबाबत शासनाने डोळझाकपणा केल्याने आता दुकानदारांनी १ मेपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे-सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा सचिव नितीन कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, प्रशांत पाटील, विजय राऊत, योगेश शिंदे, संतोष गुरव, राजाभाऊ चाळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)