शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नगराध्यक्षपदावरून रस्सीखेच

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

दोडामार्ग नगरपंचायत : शिवसेनेच्या सहकार्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी

कसई दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-पुरुष आरक्षण पडले आहे. मात्र, अद्याप या नगरपंचायत निवडणुकीत सतरा जागांपैकी शिवसेना ५, भाजप ५ अशा एकूण दहा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवूनदेखील नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपचेही तेवढेच योगदान आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद भाजपकडे द्यावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत सतरा जागांपैकी भाजप ५, शिवसेना ५ असे युतीचे १०, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ असे आघाडीचे सहा, तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला. सतरा जागांपैकी दहा जागा युतीकडे असल्याने या नगरपंचायतीवर युतीची सत्ता असल्याचे चित्र स्पष्ट होते. नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागासवर्ग महिला किंवा पुरुष असे पडल्याने अनेकांचे पत्ते कट झाले.नागरिकांचा मागास प्रवर्गातून शिवसेना-भाजपकडे निवडून आलेले उमेदवार असल्याने या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. जोरदार रस्सीखेचही सुरू आहे. यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांच्याशी संपर्क साधला असता, या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष भाजपचा बसणार आहे. अडीच-अडीच वर्षे दोन्ही पक्षांचे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष राहणार असल्याचे वरिष्ठ पातळीवर निश्चित केले आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा बसेल, असे धुरी यांनी सांगितले. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले की, नगराध्यक्ष निवडीसंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नसून, नगराध्यक्ष शिवसेनेचा की भाजपचा हे निश्चित झालेले नाही. नगराध्यक्षपदी भाजपचाच नगराध्यक्ष बसला पाहिजे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. राज्यात युतीची सत्ता आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे पालकमंत्री, खासदार, आमदार ही महत्त्वाची पदे आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपचेही मोेठे योगदान आहे. राज्यात सेना-भाजपची सत्ता असून, जिल्ह्यात भाजपकडे कोणतीही महत्त्वाची पदे नाहीत. तेव्हा कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सेना-भाजपने युतीच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व मिळविले. नगरपंचायतीवर नगराध्यक्षपद भाजपकडे देऊन नगराध्यक्ष युतीच्या माध्यमातून करावा. एवढे तरी जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला सहकार्य करावे, अशी अपेक्षा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)भाजप कार्यकर्त्यांचा नगराध्यक्षपदासाठी आग्रहकसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरा जागांपैकी दहा जागा युतीने जिंकल्या. मतदारांनी विश्वास ठेवून युतीच्या उमेदवारांना निवडून आणले. नगराध्यक्ष शिवसेनेचा बसावा, अशी शिवसेनेची मागणी असून, भाजपचा पहिला नगराध्यक्ष का बसू नये, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित करत नगराध्यक्षपदासाठी आग्रह धरला आहे.