शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय!

By admin | Updated: January 3, 2017 23:19 IST

विद्यार्थ्यांसमोर इच्छा व्यक्त : सावंतवाडीत स्पर्धा परीक्षेबाबत केले मार्गदर्शन

सावंतवाडी : मी घरात शिवराज्याभिषेकाचे छायाचित्र लावले आहे. त्यातून मला प्रेरणा मिळते. राज्याच्या राजकारणातील सर्व महत्त्वाची पदे भूषविली असली, तरी मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. ती कधीही दडवून ठेवली नाही. माणसाने महत्त्वाकांक्षी असलेच पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी काढले. ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन अंगीकृत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिरात मंगळवारी बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, सेवा दलाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, रणजित देसाई, शिक्षणाधिकारी रंगराव काळे, गजानन गणबावले, नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू बेग, गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवाजीराव देसाई, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डी. ए. सरडे, संपत गायकवाड, आदी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, मी गेली ३१ वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी माझे जवळचे संबंध आहेत आणि ते मी कायम टिकवून ठेवले आहेत. प्रत्येक अधिकारी हा मेहनतीने पुढे जात असतो. यूपीएसीमध्ये महाराष्ट्राचा टक्का फारच कमी आहे, पण बिहार, केरळ, तमिळनाडू या उत्तरेकडील राज्यांतून मोठ्या प्रमाणात आयएएस व आयपीएस होऊन विद्यार्थी महाराष्ट्रात अधिकारी म्हणून येतात. असे विद्यार्थी सिंधुदुर्गमधून देशात कधी पहायला मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वी शैक्षणिक टक्केवारीत मागे होता, पण आता तो झपाट्याने पुढे जात आहे. त्यासाठी नारायण राणेंसारखे द्रष्टे नेते लाभले आहेत. ते नेहमीच मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी केले. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील शैक्षणिक टक्केवारी पाहता आगामी काळात येथील विद्यार्थी आयपीएस, आयएएस या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, असा आशावाद शिक्षण सभापती आत्माराम पालेकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचेअध्यक्ष सतीश सावंत यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी संग्राम प्रभुगावकर, प्रमोद सावंत, आत्माराम पालेकर यांनी नारायण राणेंचा पुष्पहार घालून सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांशी शाळेची मुले उपस्थित होती. (प्रतिनिधी)