शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीचे प्रश्न सोडविण्यात राणे, जठार अपयशी

By admin | Updated: October 24, 2015 00:41 IST

शैलेश भोगले : काँग्रेस आणि महायुतीला मते मागण्याचा अधिकार नाही

वैभववाडी : वाभवे-वैभववाडीच्या पायाभूत समस्या सोडविण्यात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे तसेच माजी आमदार प्रमोद जठार सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असे मत मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.येथील मनसे कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग नाईक, तालुकाध्यक्ष सचिन तावडे, महिला जिल्हाध्यक्षा भारती रावराणे, जिल्हा चिटणीस अशोक रावराणे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र सत्तेवर असताना ही मंडळी विकास करू शकली नाहीत.भोगले म्हणाले म्हणाले की, वैभववाडीचा पाणी प्रश्नही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार नीतेश राणे या प्रश्नासाठी वर्षभरात एकदाही फिरकले नाहीत. माजी आमदार जठार यांनी पाच वर्षात फक्त घोषणाच केल्या. आता सत्ता असूनसुद्धा ते काही करू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे आणि प्रमोद जठार वैभववाडीच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. तेच आता मते मागत घरोघरी फिरत आहेत.ते पुढे म्हणाले, आमदार असताना जठार यांनी एस. टी. स्थानकाचा मुद्दा उचलून धरला होता. मात्र, सत्ता आल्यावर हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे हेही या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. भाजी, मासळी, मटण मार्केट रस्त्यावर आहे. याबाबत सत्ताधारी आणि आमदार काहीच करू शकलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एकाच प्रभागात उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मनसेचा उमेदवार निवडून आल्यावर नगरपंचायतीत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचक ठेवण्याचे काम करेल, असा विश्वास भोगले यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या?एस. टी. स्थानकाच्या प्रश्नात आमदार नीतेश राणे काहीच करू न शकल्याच्या आरोपावर आमदार राणे यांच्या मागणीवरून खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी बसस्थानकासाठी २५ लाख देण्याची घोषणा केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता बसस्थानकासाठी जागेचा प्रश्न महत्वाचा आहे. जागेचाच मूळ प्रश्न सुटत नसेल तर पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या? असा सवाल शैलेश भोगले यांनी केला.