शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रमाई नदीतील गाळ उपसा होणार

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

विनायक राऊत : मसुरेतील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत

चौके : मालवण तालुक्यातील मसुरे येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाई नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नदी पूर्णपणे बुजून गेल्याची स्थिती आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो एकर शेती अवलंबून असून, साचलेला गाळ पावसात पूर परिस्थितीस कारणीभूत ठरतो. तसेच इतर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रमाई नदीपात्राची पाहणी करत या नदीपात्रातील गाळ तातडीने उपसा करण्यासाठी अधिकारीवर्गाला सूचना देत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्या आहेत.या पाहणी दौऱ्यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत शिवसेना कामगार संघटना सरचिटणीस जयवंत परब, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगांवकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, तालुकाप्रमुख बबन शिंदे, विभागप्रमुख राजा कोरगांवकर, सतीश प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच बंदर विभाग, खारलँडचे अधिकारी उपस्थित होते. नदीपात्रातील गाळ उपशाबाबत जयवंत परब यांनी वारंवार खासदार राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.डोझरच्या सहाय्याने हा गाळ तत्काळ काढला जावा व गोवा धर्तीवर नदीपात्रात फायबर बंधारे बांधण्यात यावेत असे सुचविले. यावेळी खासदार राऊत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर गाळ काढण्याची कार्यवाही करावी. आवश्यक ती कागदपत्रे जमा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)जिल्हा परिषदेतर्फे दीड कोटीची तरतूदया नदीपात्रातील गाळ गेली अनेक वर्षे वाढत आहे. वृक्षतोड, नदीवर बांधण्यात येणारे बंधारे तसेच माती व अन्य कारणांनी गाळ वाढत आहे. मात्र, गाळ उपसा करण्याची कार्यवाही झाली नाही. असे असले तरी २०१३ साली जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन बैठकीत याबाबत दीड कोटीची तरतूद करत गाळ उपशासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.- संग्राम प्रभुगावकर जिल्हा परिषद सदस्य, मसुरे