शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत राजेंद्र रावराणे पॅनेलचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 10:53 IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन निवडणुकराजेंद्र रावराणे पॅनेलचा विजय

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने विजय संपादन केला आहे.

जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक जिल्हा न्यायालयाच्या वकील चेंबरमध्ये पार पडली.  निवडणुकीसाठी चार पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र या चार पॅनेलपैकी वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली आहे.

या पॅनेलचे पाचपैकी चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर वकील अजित भणगे यांच्या पॅनेलचे अमोल मालवणकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे, वकील अजित भणगे, वकील सुभाष पणदूरकर व वकील विद्याधर चिंदरकर ही पॅनेल उभी राहिली होती. यात वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.

या बार असोसिएशन निवडणुकीत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र रावराणे, पुरुष उपाध्यक्षपदी वकील गिरीश गिरकर तर महिला उपाध्यक्षपदी अ‍ॅड. वेदिका वीरेश राऊळ उर्फ तृप्ती सावंत आणि सहसचिवपदाच्या निवडणुकीत वकील यतीश खानोलकर हे रावराणे पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत तर सचिवपदाच्या निवडणुकीत वकील अजित भणगे पॅनेलचे अमोल मालवणकर हे विजयी झाले आहेत.सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वकील चेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ५१५ वकिलांपैकी ४६६ वकिलांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वकील विलास परब यांनी काम पाहिले. या विजयानंतर विजयी सर्व वकिलांचे वकील संग्राम देसाई आदींनी अभिनंदन केले.

टॅग्स :advocateवकिलCourtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग