शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

मतांच्या विभागणीवर राजापूरची गणितं....

By admin | Updated: October 8, 2014 23:00 IST

तुटलेली युती अन् आघाडी : चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत

राजापूर : तुटलेली युती आणि न झालेली आघाडी या पार्श्वभूमीवर राजापूर -लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा यांच्यातच चौरंगी लढत पहावयास मिळेल. यामध्ये मतांची होणारी विभागणी इथली राजकीय गणिते कशी बिघडवते, त्यावरच उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे मागील काही निवडणुकांप्रमाणे यावेळीही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.सन १९९९नंतर पुन्हा एकदा राजापूरच्या रिंगणात जास्त उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रथमच लढलेला राष्ट्रवादी काँग्रेस नंतरच्या निवडणुकीत काँग्रेससमवेत आघाडी करत होती. मात्र, यावेळी आघाडी तुटली व राष्ट्रवादीने रिंगणात उडी मारली आहे. आजवर शिवसेनेशी युती करुन लढणारा भाजपदेखील यावेळी स्वबळावर रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भाजपचे कमळ प्रथमच संपूर्ण मतदारसंघात पोहोचत आहे. या निवडणुकीत पक्ष निशाणीसह घराघरात पोहोचवायचा, हेच भाजपाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसह आता राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पक्ष राजापूरच्या रणांगणात शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. परिणामी येथे चौरंगी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये होणार आहे.या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे एकूण अकरा गट व त्याअंतर्गत बावीस पंचायत समिती गण येतात. त्यातील काँग्रेस व भाजपाकडे प्रत्येकी एक जिल्हा परिषद असून, उर्वरित नऊ गटांवर सेनेचा कब्जा आहे. पंचायत समितीचे चार गण काँग्रेसकडे असून, दोन राष्ट्रवादीकडे आहेत. उर्वरित सोळा पंचायत समिती गणांवर शिवसेनेचा भगवा आहे. फक्त राजापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. येथे सेनेचे तीन व भाजपाचे दोन नगरसेवक आहेत. या मतदारसंघात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूळ पाया ठरणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जास्त वर्चस्व सेनेचे असून, त्याखालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांचे आहे. येथेदेखील किरकोळ प्रमाणात भाजपाचे स्थान आहे. हे चित्र या मतदार संघातील आजची परिस्थिती दर्शविते. मनसेने यावेळी उमेदवार उभा न केल्याने त्यांची मते कोणत्या उमेदवाराला पडतात, हादेखील महत्त्वाचा भाग आहे.प्रमुख पक्षांदरम्यान चौरंगी लढत होत असल्याने यावेळी मतांची होणारी विभागणी विजयाची गणिते बिघडवणारी ठरु शकतात. याचा फटका विभक्त झालेल्या आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीला बसणार आहे. यापूर्वी एकत्र लढूनदेखील विजयाचे उद्दिष्ट त्यांना गाठता येत नसे. त्यामुळे संशयाची सुई कायम राष्ट्रवादीभोवती फिरायची. रत्नागिरीत शिवसेना राष्ट्रवादीला छुपी साथ देते. त्याची परतफेड राष्ट्रवादी राजापूर मतदार संघात सेनेला मते देऊन करते, अशी चर्चा गेल्या चार - पाच वर्षांपासून सुरू आहे. यावेळी स्वतंत्र उमेदवार रिंगणात असल्याने अशी छुपी युती होण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून मिळणारी काही मते सेनेला गमवावी लागतील. त्यामुळे सेनेला राष्ट्रवादीबरोबरच भाजपाच्याही मतांना मुकावे लागणार आहे. (प्रतिनिधी)