शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचा युवक अपघातात ठार

By admin | Updated: December 30, 2016 23:40 IST

तोरसे येथील घटना : औषधाची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तोरसे गोवा येथे तोरसे पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरील पत्रादेवीनजीक कंटेनर उलटून झालेल्या अपघातामध्ये जितेंद्र दीपक शिंदे (वय २८, रा. हातिवले, ता. राजापूर) हा चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडल्याचे पेडणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत पेडणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यावरून मुंबई येथे औषधाची वाहतूक करण्यासाठी निघालेला कंटेनर (एमएच ०७-५५४४) हा गुरुवारी रात्री तोरसे चेक पोस्ट व पत्रादेवी सर्कलजवळील दुभाजकाला जोरात धडकला. या धडकेमुळे कंटेनर रस्त्यावर उलटला. या अपघातामध्ये चालक जितेंद्र दीपक शिंदे हा जागीच ठार झाला. या अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे तेथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पेडणे पोलिसांना या अपघाताबद्दल कळविण्यात आले. पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या अपघाताबाबत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा-बांबुळी येथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची पेडणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पराग पारेख करीत आहेत. (प्रतिनिधी)