शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मालवणच्या उपनगराध्यक्षपदी राजन वराडकर

By admin | Updated: December 29, 2016 22:01 IST

स्वीकृत नगरसेवक निवड बिनविरोध : सभा बेकायदेशीर असल्याचा सुदेश आचरेकरांचा आक्षेप

मालवण : मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षसह स्वीकृत नगरसेवकांवरून युतीच्या पूजा करलकर यांच्यासह काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गेले काही दिवस शहरात युतीतील धुसपुस चव्हाट्यावर येत असताना गुरुवारी पालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी राजन वराडकर (भाजप) तर स्वीकृत नगरसेवक पदी नितीन वाळके (शिवसेना) व दीपक पाटकर (काँग्रेस) यांची बिनविरोध निवड पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जाहीर केली. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार वेळेच्या चौकटीत राहून कांदळगावकर यांनी निवड प्रक्रिया हाताळली.सभेच्या सुरवातीला अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी सभा बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेतला. सभेची नोटीस नगरसेवकांना तीन दिवस अगोदर देणे गरजेचे होते. नगराध्यक्ष पदी २६ रोजी दुपारी पदभार स्वीकारल्यामुळे केवळ दोन दिवसांचाच कालावधी मिळत आहे. यातून चुकीचा पायंडा पाडला असून ही निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे. लोकप्रतिनिधी किंवा आम जनतेने तक्रार केल्यास सभा बेकायदेशीर ठरू शकते, असा आरोप केला. मात्र सदरील सभा नियमात असून राजपत्रात दिलेल्या कलमांनुसार आहे असे फटकारत पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सभेला सुरुवात केली. नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक यतीन खोत, जगदीश गावकर, मंदार केणी, सुदेश आचरेकर, पंकज साधये, गणेश कुशे, आप्पा लुडबे, शीला गिरकर, ममता वराडकर, दर्शना कासवकर, सेजल परब, पूजा करलकर, पूजा सरकारे, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर तसेच स्वीकृत नगरसेवक दीपक पाटकर, नितीन वाळके आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष निवडीनंतर भाजपाचे युवा नेते संदेश पारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. (प्रतिनिधी)दीपक पाटकरांचे ‘कमबॅक’, एकीने शहराचा विकास करूया!जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दीपक पाटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र जनसेवक म्हणून ओळख लाभलेल्या पाटकर यांनी पुरागमान करावे, अशी जनतेची इच्छा होती. त्यानुसार आघाडीकडून दीपक पाटकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. पाटकर यांच्या कमबॅकने कार्यकर्त्यांत उत्साह पसरला होता. तर युतीकडून सेनेच्या नितीन वाळके यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवडून जाहीर करण्यात आली. उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवक पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.उपनगराध्यक्ष पदासाठी युतीकडून भाजपच्या राजन वराडकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. पिठासीन अधिकारी कांदळगावकर यांनी छाननी अंती तो वैध ठरवत राजन वराडकर यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी भाजपचे युवा नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी राजन वराडकर यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुचीर्चा ताबा देत शुभेच्छा दिल्या. मालवणात युतीची सत्ता असली तरी सर्वपक्षीय नगरसेवक आहेत. मालवणचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून विकास करूया. नगरसेवक आपल्या पदाला न्याय देताना जनतेच्या अपेक्षा नक्की पूर्ण करू, अशी ग्वाही मंदार केणी, नितीन वाळके, सुदेश आचरेकर, पूजा करलकर यांनी दिली.