शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

राजन तेलींच्या मुलावर हल्ला

By admin | Updated: January 18, 2017 23:57 IST

दादर रेल्वेस्थानकातील घटना : नीतेश राणे यांच्या विरोधात गुन्हा

मुंबई : भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर स्थानकात मंगळवारी रात्री हल्ला झाला. प्रथमेशने केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेसचे आमदार तथा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्यासह एकूण पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए-१ बोगीत प्रवेश केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर काही सामान तर राहिले नाही ना हे पाहण्यासाठी प्रथमेश पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. तेव्हा समोरचउभ्या असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीने प्रथमेशशी हात मिळवला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्यानेही मारहाण केली. त्यातील एकाने ‘गाडीखाली ढकलून दे’, अशी धमकीही दिली. प्रथमेशने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्याचे दोन भाऊ मदतीला आले. त्यानंतर दोघे पळू लागले. त्यातील एकाला ‘आरपीएफ’च्या जवानाने पकडले. घटनेनंतर प्रथमेशने दादर लोहमार्ग पोलिसांत नीतेश राणे यांच्यासह एकूण पाचजणांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणीत खरात याला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन साथीदार आकाश साळवी, विनीत गायकवाड, मोहित गरुड यांचा शोध घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राजन तेली आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांवर काही प्रतिक्रिया न देणे, हेच बरे आहे. - नीतेश राणे, आमदारप्रथमेश तेली यास मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीनजणांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात नीतेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. - निकेत कौशिक, लोहमार्ग-पोलिस आयुक्त