शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजन साळवी रुग्णालयात, प्रकृती स्थिर

By admin | Updated: August 14, 2016 00:27 IST

कोल्हापूरला हलविले :मुंबईतही केल्या होत्या तपासण्या

रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात तत्काळ प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिक तपासण्यांसाठी त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.आमदार साळवी यांना सकाळपासूनच काहीसे अस्वस्थ वाटत होते. हाताला सारख्या मुंग्या येत होत्या. त्यामुळे सकाळी आठ वाजण्यापूर्वीच ते एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरनी त्यांचा ईसीजी काढला. मात्र, तो निर्दोष असल्याचे संबंधित डॉक्टर्सनी सांगितले. त्यामुळे साळवी यांनी ८.३0 वाजल्यापासून आपला नियमित दिनक्रम सुरू केला. शनिवारी खासदार विनायक राऊत रत्नागिरीमध्ये होते. त्यामुळे आमदार साळवी विश्रामगृहात गेले. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक होती. तेथेही साळवी उपस्थित होते.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साळवी यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर शनिवारी रत्नागिरीत उपलब्ध नसल्याने कार्डियॅक अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. मात्र, मारुती मंदिर येथे येईपर्यंत त्यांना खूप घाम येऊ लागला आणि अधिक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना डॉ. संजय लोटलीकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच साळवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेथे त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली.बसलेला धक्का तीव्र असल्याने भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला असून, त्यासाठी त्यांना सायंकाळी साडेसात वाजता कोल्हापूरला नेण्यात आले. (प्रतिनिधी)मुंबईतही केल्या होत्या तपासण्याअधिवेशन काळात आमदार साळवी यांनी मुंबईत स्ट्रेस टेस्ट केली. ती ‘नॉर्मल’ आल्याने ते निश्चिंत होते. मात्र अशा तपासण्या काहीवेळा फसव्या ठरतात. शरीरात कोणताही बिघाड झाला नसल्याचे या तपासण्यांमध्ये निदर्शनास आले तरी आणखी चाचण्या गरजेच्या ठरतात.रुग्णालयासह रस्त्यावरही प्रचंड गर्दीआमदार साळवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर शहरभर पसरले. त्यामुळे रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. केवळ रुग्णालयाचा परिसरच नाही, तर बाहेरच्या रस्त्यावरही असंख्य लोक जमा झाले होते.