शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रद्द झालेल्या स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 16:41 IST

ओरोस : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. मागील आठवड्यात सतत कोसळणाºया पावसामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देमैदानातील पाणी कमी झाल्याने खेळांचा मार्ग मोकळा पहिल्या दिवशी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलचा समावेश

ओरोस ,27 : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. मागील आठवड्यात सतत कोसळणाºया पावसामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

बुधवारी झालेल्या या स्पर्धांमध्ये १४ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी आरपीडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांच्या हस्ते औपचारिक पद्धतीने करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक हवामानात बदल होऊन मागील आठ, दहा दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नदी, नाले, तलाव तसेच क्रीडांगणातील मैदानात पाणीच पाणी साचले होते.

दरम्यान, याचवेळी जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ््यात कोणत्याही शालेय क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांना अपघात घडू नये याकरिता या स्पर्धा आठ दिवस रद्द करून पुढे घेण्याचे आश्वासन क्रीडा विभाग तसेच आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांनी अधिकारीवर्गांना फोनद्वारे कळविले होते. त्यामुळे या क्रीडा स्पर्धा पुढे घेण्याचा निर्णय सर्वच शालेय शिक्षक व क्रीडापंचानी घेतला होता.

खो-खो, कबड्डी स्पर्धांनी प्रारंभबुधवारी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे पुन्हा भरविण्यात आल्या आहे. त्यात आज १४ वर्षाखालील मुले, मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षाखालील मुले-मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षाखालील मुले-मुली, कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा या स्पर्धा आज झाल्या. यात क्रीडा शिक्षक पालक व क्रीडापंचांनी आपली जबाबदारी घेत क्रीडा स्पर्धा सुरू ठेवल्या आहेत.