शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

By admin | Updated: August 7, 2016 01:02 IST

खारेपाटण गावात पाणी घुसले : पूरजन्य स्थिती; कसाल येथे घराची भिंत कोसळली

ओरोस/खारेपाटण : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. खारेपाटण शहरात तर पाणी घुसले असून तेथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसामुळे कुडाळ तालुक्यात कसाल बौद्धवाडी येथे काशिबाई राजाराम पाडगांवकर यांच्या घराची भिंत कोसळली. याठिकाणी कसालचे तलाठी बी. एन. हातवटे, कोतवाल सुरेश परब, घरमालक काशिबाई पाडगांवकर यांच्यासमोरच पाहणी करून पंचयादी घालण्यात आली व योग्य तो मोबदला दिला जाईल असे तलाठी हातवटे यांनी आश्वासन दिले.जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळेच काशिबाई पाडगांवकर यांच्या घराची भिंत सकाळी ६.३० वाजता कोसळली. घरातील पाचहीजण सुखरुप आहेत. त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या विजया दत्ताराम कदम यांच्या घराची कौले उडून गेली आहेत. या दोन्ही घरांची पंचयादी हातवटे यांनी केली.नैसर्गिक आपत्ती प्रकरणात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे कागदपत्रे पाठविली आहेत. मुसळधार पावसामुळे खारेपाटण येथे पाणी घुसले असून त्यामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.खारेपाटण येथे शनिवारचा आठवडा बाजार होता. त्यामुळे पहाटेच कोल्हापूरहून व्यापारी येथे येत असतात. पण शहरात पहाटे चारपासून पाणी घुसल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून शहरात येणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या गाड्या खारेपाटण बसस्थानकात न आणता खारेपाटण महामार्गावरच थांबविण्यात आल्या. तर शनिवारचा आठवडा बाजार महामार्गावरील खारेपाटण वरच्या स्टँडवर भरविण्यात आला.पहाटे घुसलेले पुराचे पाणी सकाळी १० वाजल्यानंतर हळूहळू ओसरू लागले. मात्र काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणेच पसंत केले. दरम्यान, खारेपाटण बाजारपेठ ते भैरीआळी, जैनवाडीकडे जाणारा रस्ता तसेच खारेपाटण हायस्कूल ते बसस्थानकाकडे येणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे प्रवाशांना एस. टी. बस पकडण्यासाठी महामार्गावर जावे लागत होते. खारेपाटण येथील मच्छि मार्केट इमारतीमध्ये तसेच अमोल तळगावकर यांच्या बंगल्याला चारी बाजूंनी पाण्याने वेढले होते. तसेच गुरव कॉम्प्लेक्समध्ये पुराचे पाणी शिरले होते. मच्छि मार्केटकडील सर्व छोट्या दुकानात पाणी घुसले होते. तसेच खारेपाटण येथील भैरीआळी, जैनवठार, बंदरवाडी, शिवाजीपेठ, काझीवाडा, चर्मकारवाडी, कपिलेश्वर वाडी, रामेश्वर मंदिर आदी भागात पुराचे पाणी घुसले होते. तर बिगे भाटले येथील भातशेती व भाटी येथील भातशेती पूर्णत: पाण्याखाली गेली होती. पुरामुळे बाजाराला येणाऱ्यांची तारांबळ उडाली. बाजार नेमका कुठे भरणार हे त्यांना माहित नव्हते. पण नेहमीप्रमाणे हा बाजार मुंबई-गोवा महामार्गावर भरविण्यात आला. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे १० फूट खोल पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना पर्यायी पायवाटेने खारेपाटण बाजाराकडे जावे लागले.(वार्ताहर)सावधानतेचा इशारा : २४ तासात ५८.६३ मिमी पाऊसयेत्या ४८ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी जिवीत व मालमत्तेची योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सावधानतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५८.६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाऊस असा- दोडामार्ग ३५, सावंतवाडी ४५, वेंगुर्ले १७, कुडाळ ७२, मालवण ३६, कणकवली १०१, देवगड ४९, वैभववाडी ११४.