शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडाच्या शेतीला पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:19 IST

आठ एकर शेतीचे नुकसान : शेतकरी हवालदिल, आंबा-काजूच्या धर्तीवर नुकसानभरपाईची मागणी

शिवाजी गोरे - दापोली  कोकणातील शेतकरी अलिकडे केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता दुबार पीक घेऊ लागला आहे. भातशेतीचा हंगाम संपल्यावर भाजीपाला, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जात आहे. दापोली तालुक्यात ठिकठिकाणी आता कलिगडांची लागवड केली जात आहे. पंकज सुरेश जागडे या तरुण शेतकऱ्याने १२ वर्षे कलिंगड शेतीचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, पावसाने कलिंगड पिकावर करपा पडून संपूर्ण पीक हातचे गेल्यामुळे जीवन जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत.आंबा, काजू नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाल्याने पंचनामे सुरु झाले आहेत. पंरतु कलिंगड शेतीचा पंचनामा न झाल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, याबद्दल शेतकऱ्याला चिंता वाटू लागली आहे.पंकज जागडे हा गेली १२ वर्षे कलिंगड शेती करीत आहे. स्वत:कडे जमीन नसतानासुद्धा भाड्याच्या जमिनीत कलिंगडाची लागवड करुन सुशिक्षीत बेकार तरुण मोठ्या जिद्दीने उभा राहात होता. यावर्षीसुद्धा ८ एकर जमिनीवर कलिंगडाची लागवड केली होती. २ लाख रुपये कर्ज काढून भाड्याने जमीन घेऊन मोठ्या जिद्दीने कलिंगडाची लागवड केली होती. पंकज जागडे व प्राजक्ता जागडे या जोडप्याने दिवसरात्र मेहनत करुन कलिंगड शेती केली होती. शेतसुद्धा मोठ्या जोमाने वाढले. कर्ज फिटून आपल्याला ३ लाख ते ४ लाख रुपये नफा मिळेल, अशी अपेक्षा बाळगून सुखी कुटुंबाची स्वप्नसुद्धा रंगवली जात होती. मात्र, अवकाळी पाऊस आला व होत्याचे नव्हते झाले. अवकाळी पावसाने कलिंगडाच्या वेलीवर करपा पडला व संपूर्ण वेलच वाळून गेली. करपा पडल्यानंतर अवघ्या दोन - तीन दिवसात शेती नष्ट झाली. कलिंगडाचे पीक तयार होण्याच्या मार्गावर होते. परंतु अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या. दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी कलिंगडाची इंडो अमेरिका, अगस्ता ३ किलो बियाण्याची लागवड केली. औषध फवारले, पंपाने नदीचे पाणी आणून कलिंगड शेती फुलविली. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, असे वाटत असताना अवकाळी पाऊस झाला.कोकणात केवळ आंबा, काजूला मदत दिली जाते. परंतु आंबा, काजूप्रमाणे इतर पिकांनासुद्धा नुकसान भरपाई मिळावी. कलिंगड पिकाचे नुकसान झाल्याने आमचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, याचीच काळजी वाटत आहे. स्वत:ची शेतजमीन नसल्यामुळे भाड्याची शेती घेऊन वर्षातून एकदाच कलिंगड पीक घेतो. त्या पिकावर आमचा उदरनिर्वाह चालतो. आता पीकच गेले जीवन जगायचे कसे हा प्रश्न भेडसावत आहे.- पंकज जागडे, शेतकरी