शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

सिंधुदुर्गात संततधार : बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम; यंत्रणा अलर्ट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच अधून-मधून जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरणासह कोसळणाऱ्या संततधार पावसाने गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकण रेल्वे, एस. टी., खासगी प्रवाशी गाड्यांमधून लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे संबंधित यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरवर्षी धो धो कोसळणारा पाऊस यावर्षी म्हणावा तसा पडलाच नाही. त्यामुळे भात शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतरही जोरदार पाऊस नसल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, गेले दोन दिवस जोरदार पावसाने ‘कम बॅक’ केला आहे. ढगांचा गडगडाटही होत आहे. रविवारपासून तर पावसाचे प्रमाण वाढल्याने गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतलेले भाविक धास्तावले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांवरही परिणाम होत असल्याने व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारपेठेतील उलाढालीवर पावसामुळे निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याचा फटका मोठ्या व्यापाऱ्यांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही बसणार आहे. त्याचप्रमाणे गणरायाच्या दर्शनासाठी मित्र परिवाराकडे जाण्यावर मर्यादा येणार असल्याने तरुणवर्ग काहीसा नाराज आहे. दरम्यान, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत असला तरी पावसाचा जोर असाच राहिला तर ऐन उत्सवाच्या काळात भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे किंवा पाणी साठे पूर्णपणे भरले नसल्याने आगामी काळातील पाणी टंचाईपासून मुक्तता होण्यासाठी पावसाची गरज आहे, अशा प्रतिक्रियाही सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. (वार्ताहर)