शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे महिलांकडे दुर्लक्षच!

By admin | Updated: October 24, 2015 00:24 IST

महिलांची खंत : एकच डबा राखीव असल्याने चेंगराचेंगरी

सागर पाटील - रत्नागिरी -रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. प्रत्येक गाडीला महिलांसाठी केवळ एकच डबा राखीव असल्याने अनेक महिलांना चेंगराचेंगरीत व उभा राहून प्रवास करावा लागतो. याबाबत रेल्वे प्रशासन कोणताही निर्णय घेत नसल्याबाबतची खंत महिला प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर ही स्थिती नेहमीच पहायला मिळते.सध्या पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांच्या प्रभागात वाढ झाली आहे. यामुळे स्वतंत्रपणे प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अन्य वर्गांचे तिकीट न घेता महिलांसाठी राखीव असणाऱ्या डब्यातून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु, जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी केवळ एकच डबा असल्याने महिलांसमोर मोठी अडचण निर्माण होताना दिसत आहे. अनेक रेल्वे गाड्यांमध्ये महिलांचा राखीव डबा हा सामान्य डब्यांच्या तुलनेत आकाराने लहान असतो. या डब्यांची आसन क्षमता जवळपास ३२ ते ४० इतकीच असते.महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा गाडीतील अन्य डब्यांमध्ये फारशी गर्दी नसते. पण महिलांचा डबा खचाखच भरलेला असतो. महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे महिलांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना पहायला मिळतात. अनेक महिला दरवाजात बसून प्रवास करतात. अगदी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये पण हीच परिस्थिती पहायला मिळते.स्वतंत्र डबे : सुखकर प्रवास हवामहिलांसाठी स्वतंत्र डबे वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महिला सुरक्षित व सुखकर प्रवास करु शकतील.- रचना कदम,सिंधुदुर्ग.कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव डब्यांची संख्या कमी असल्याने महिलावर्गाची गैरसोय होत आहे. या डब्यांची संख्या वाढवली पाहिजे.महिलांची बाचाबाचीरेल्वेमध्ये महिलावर्गासाठी असणाऱ्या डब्यांची संख्या कमी असल्याने डब्यात महिलांची गर्दी होते. त्यामुळे महिलांमध्ये बाचाबाची होताना दिसते.