शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

रोजंदारी मजुरांचा प्रश्न निकाली

By admin | Updated: December 7, 2015 00:19 IST

कृषी विद्यापीठ : ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा; २० वर्षांच्या लढ्याला यश

शिवाजी गोरे-- दापोली---राज्यातील कृषी विद्यापीठात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ मजूर रोजंदारीवर काम करीत होते. या मजुरांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून, दापोली कृषी विद्यापीठातील १०४ मजुरांना सामावून घेण्यात आले आहे.या कामगारांच्या लढ्याला ‘लोकमत’ने साथ दिली होती. राज्यातील तीन कृषी विद्यापीठांत ११५९ रोजंदारी मजुरांना कायम करण्यात यावे, अशी मागणी मजूर संघटनांनी केली होती. विधानपरिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी या मजुरांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन १९ मार्च २०१५ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठांतर्गत ११५९ मजुरांना कायमस्वरुपी सामावून घेण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घेणे सुुरू झाले असून, दापोली कोकण कृषी विद्यापीठातील १०४ रोजंदार मजुरांना कामावर सामावून घेण्यात आले आहे. तसेच इतर विद्यापीठांनी काही कर्मचाऱ्यांना सामावून घेतले असून, पुढील प्रक्रिया सुुरू आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठातील ३२५ रोजंदारी मजुरांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्यायचे आहे. दापोली विद्यापीठासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या कृषी विद्यापीठातील ११५९ रोजंदारी मजुरांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचे तीनही विद्यापीठांना आदेश देण्यात आले असून, रिक्त पदानुसार व सेवाज्येष्ठतेनुसार सेवेत सामावून घेण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विद्यापीठनिहाय मजूर व कुशल, अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार प्रथम केवळ रिक्त पदावरच समावेश करून घेण्यात येत आहे. उर्वरित रोजंदारी मजुरांबाबत त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केल्यानंतर त्यांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.‘लोकमत’ने रोजंदारी मजुरांच्या व्यथा मांडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दापोली कोकण कृ षी विद्यापीठाकडून कायमस्वरुपी सेवेचा आदेश मिळताच रोजंदारी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.महाराष्ट्र शासनाचे उपसचिव क. य. वंजारे यांनी सर्व विद्यापीठांना शासन निर्णयान्वये कळविल्याने रोजंदारी मजुरांचा प्रश्न निकाली निघाला आहे.