शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मळगावमधील ‘त्या’ रस्त्याचा प्रश्न सुटेना

By admin | Updated: April 11, 2017 00:27 IST

सुतारवाडीतील ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत : महामार्गालाही संभाव्य धोका, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली सात वर्षे मळगाव सुतारवाडीतील रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच बॉक्सवेलचे काम अर्धवट आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेली वाहतूक आता धोकादायक बनत आहे. राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, वारंवार विनंती, सूचना व तक्रारी करूनही हे काम पूर्ण करण्यास विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ऐरणीवर आलेली ही समस्या सोडविण्यासाठी संतप्त ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई-गोवा झाराप-पत्रादेवी महामार्गालगत बायपास अंतर्गत मळगाव-सुतारवाडी रस्ता येतो. पूर्णपणे या रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. या मार्गावरील सर्व बायपास रस्त्यांचे कामकाज पूर्ण झाले. फक्त हा एकमेव रस्ता अर्धवट स्थितीत संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठेवला आहे. बाकीचे अपूर्ण रस्ते पूर्ण झाले असताना हाच रस्ता अपूर्ण ठेवून काय ईप्सित साध्य होत आहे, असा सवाल ग्रामस्थांसमोर उपस्थित केला जात आहे. सध्या संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्यासाठी डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगून ग्रामस्थांना टाळत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांनी उपोषण केल्यानंतर हा प्रश्न समोर येणे म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. या जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री यांनीही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत केलेले नाही. वारंवार येथील ग्रामस्थ गेली पाच वर्षे या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार, पायपीट करतात. पण त्यांचा अजूनही प्रश्न सुटत नाही. मळगाव-सुतारवाडीतील ग्रामस्थांनी ज्यावेळी याच महामार्गाच्या मुंबई-गोवा बायपासवर उपोषण केले तेव्हा २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण करून देतो, असे सांगितले व हा रस्ता डागडुजी करून देऊ, असेही सांगितले. पण जेव्हा संबंधित विभागाचे अधिकारी पुन्हा या ग्रामस्थांशी चर्चा करायला आले, तेव्हा दोन डंपर माती व एक डंपर दगड टाकून तात्पुरती डागडुजी करतो, असे सांगितले. पण ग्रामस्थांनी हे त्यांचे मत मान्य केले नाही. पावसाळी हंगामात हे काम पूर्णपणे वाहून जाणार. माती टाकून काही फायदा होणार नाही, असे सांगितले. जर आम्हाला चांगले काम करून द्यायचे असेल तरच करून द्या. तसेच या मार्गावरून पाणी वाहून जाण्यासाठी काँक्रिटचा गटार मारून द्या. पण निधी नसल्याचे कारण दाखवून ही मागणीही अद्यापपर्यंत त्यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे मळगाव-सुतारवाडीत साधी चारचाकी गाडी नेणेही धोक्याचे झाले आहे. जर हायवेच्या खालून दोन्ही बाजूंचे पाणी जाण्यासाठी पाईप टाकला, तर त्या पाण्याच्या मोरीवरच्या सिमेंटच्या फरशा तुटून गेल्या आहेत. वाहतूकही बंद झाली आहे. महामार्गाचा संरक्षक कठडा तुटून गेला आहे. महामार्गाची उंची वाढविण्यासाठी जो भराव टाकला, त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वारंवार याठिकाणी अपघात होतात. शिवाय मळगाव-सुतारवाडी मार्गावरील असणाऱ्या मोरीचेही काम रेेंगाळले आहे. वारवांर मागणी करूनही त्याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. तर महामार्गावरून खाली पडणाऱ्या पाण्यामुळे येथील रस्ता वाहून गेला आहे. शिवाय या मार्गावरून नित्यनियमाने होणारी वाहतूकही मोठी असल्याने सध्या या रस्त्याची चाळण झाली आहे. परिणामी ग्रामस्थ, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मागील वर्षी या रस्त्यासाठी मळगाव-सुतारवाडीतील ७० ते ८० ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी निधी नसल्याने तत्काळ डागडुजी करून दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी पत्र दिले. पण केवळ मनाच्या समाधानासाठी केलेल्या रस्त्याने ग्रामस्थांच्या उपोषणाला संबंधित खात्याने बेदखल केले. गेली पाच वर्षे या सुतारवाडीतील ग्रामस्थ या रस्त्यासाठी विनंती, सूचना, निवेदने, पत्रव्यवहार यातून अखंडीत प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या मागणीला सर्वच अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आले आहेत. केवळ तेवढ्यापुरते आश्वासन दिले जाते, नंतर मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ मेटाकुटीस आलेले आहेत. ग्रामस्थ या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.