शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचा प्रश्न अद्याप प्रलंबित!

By admin | Updated: April 6, 2016 23:28 IST

चिपळूण पालिका : महिनाभर कामबंद आंदोलन सुरुच

चिपळूण : येथील नगर परिषदेमध्ये ठेका पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या पीएफचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या कामगारांनी ६ मार्चपासून कामबंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. कोकण विभागीय कामगार आयुक्तांकडे कंत्राटी कामगारांनी व्यथा मांडूनही पीएफचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. चिपळूण नगर परिषदेत सफाई विभागामध्ये शरद खापरे यांना सफाई कंत्राटी कामगारांचा ठेका देण्यात आला होता. काही कामगारांनी २०११ ते २०१४ पर्यंत काम केले आहे. त्यांचाही पीएफचा प्रश्न सुटलेला नाही. १ मे २०१३ रोजी विविध मागण्यांबाबत कंत्राटी कामगार उपोषणाला बसले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी किमान वेतन कायद्यानुसार पगार व पीएफ मिळेल, असे आश्वासन दिल्याने या कामगारांनी उपोषण मागे घेतले होते. सन २०१६मध्ये पुन्हा कंत्राटी कामगारांचा ठेका खापरे यांना देण्यात आला. त्यामुळे पीएफची रक्कम मिळत नाही तोपर्यंत सुमारे ३६ सफाई कामगारांनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी मध्यस्थी करुन संबंधित ठेकेदार व कामगार यांच्याशी चर्चा केली. शिमगोत्सव असल्याने प्रथम कामावर हजर व्हा, त्यानंतर पीएफचा प्रश्न सोडवण्याबाबत आपण सहकार्य करू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम यांनी दिले. परंतु, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश केळसकर व शिवसेनेच्या नगरसेविका सुरेखा खेराडे यांनी प्रयत्न केले. कोकण विभागीय कामगार आयुक्त अनिल गुरव, जिल्हा सफाई कामगार आयुक्त सदस्या संपदा नारकर यांच्याकडेही या कंत्राटी कामगारांनी आपली व्यथा मांडली. लवकरच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून आपला प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात एक महिना होऊनही या कामगारांचा पीएफचा प्रश्न सुटलेला नाही. नगर परिषदेमध्ये मस्टरवर सह्या करुन नंतर ठेका पद्धतीवर आम्ही काम करीत असून, आम्हाला पगारही कमी मिळतो. इतर सवलतीदेखील मिळत नाहीत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणारा लाभ व घरासारख्या योजना कार्यान्वित करुन हक्काचे घर मिळावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. नगर परिषद प्रशासनही संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप कंत्राटी कामगारातून केला जात आहे. (वार्ताहर)