शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची ‘मात्रा’ विधानसभेतही लागू पडणार!

By admin | Updated: June 6, 2014 00:18 IST

रत्नागिरी मतदारसंघ : महायुती-आघाडीत होणार चुरशीची लढत

रत्नागिरी : शिवसेनेतील एका गटाची ‘हाराकिरी’ हाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. महायुतीला त्यामुळे या मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याची भावना शिवसेनेच्या वरिष्ठांतही आहे. परिणामी २००४ प्रमाणेच लोकसभा निवडणुकीत मिळालेले या मतदारसंघातील मताधिक्य विधानसभेलाही मिळालेच पाहिजे, अशी रणनीती शिवसेनेने आखण्यास सुरूवात केल्याने लोकसभेची ‘मात्रा’ विधानसभा निवडणुकीत लागू पडणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे रत्नागिरीत अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजयी होत आमदार व आता मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपले बस्तान बसविल्याने सेनेची ही ‘राजकीय मात्रा’ निष्प्रभ करण्यात त्यांना यश येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा पराभव करून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी रत्नागिरीची जागा महायुतीला मिळालीच पाहिजे, असा चंग आतापासूनच बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी विधानसभेची जागा मित्रपक्ष भाजपाची आहेच. परंतु राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून, महायुती सत्तेत येण्यासाठी राज्यभरातील अन्य जागांप्रमाणेच रत्नागिरीची जागाही महायुतीकडे असणे आवश्यक वाटते आहे. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच निवडणूक ‘स्ट्रॅटेजी’ विधानसभा निवडणुकीत राबविली जाणार असल्याचे संकेत जिल्ह्यात महायुतीकडून दिले जात आहेत. २००४च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अनंत गीते यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभेत बाळ माने यांना हे मताधिक्य मिळू शकले नाही, त्यामागे ‘हाराकिरी’ हा विषय होता. यावेळीही लोकसभेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सेनेचे राऊत यांना ३१ हजारांवर मताधिक्य मिळाले आहे.यावेळी लोकसभेत भाजपाने सेनेला या मतदारसंघात संपूर्ण सहकार्य दिले. त्यामुळे त्याची परतफेड म्हणून हाराकिरी करणार्‍यांना ‘खास मात्रा’ दिली जाणार असल्याची सेना गोटातील चर्चा आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)