शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संदेश पारकर गटाला धक्का

By admin | Updated: August 24, 2016 00:35 IST

काँग्रेसच्या नगरसेवकांना नशिबाने दिली साथ : कणकवली नगरपंचायतीत विषय समिती सदस्य निवड

कणकवली : येथील नगरपंचायतीच्या विषय समिती सदस्य निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत सत्ताधारी पारकर गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. काँग्रेसचा गट अधिकृत नसल्याचे सांगत प्रांताधिकाऱ्यांनी १२ नगरसेवकांमधून चिठ्ठीद्वारे समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांधकाम, पर्यटन समितीसाठी सदस्य निवडीत तब्बल ४ नगरसेवकांना नशिबाने साथ दिली. त्यामुळे पारकर गटाच्या ताब्यात असलेले बांधकाम सभापतीपद काँग्रेसच्या ताब्यात गेल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांना लॉटरी तर पारकर गटाला जोरदार धक्का बसला आहे.कणकवली नगरपंचायत विषय समिती सदस्य निवडीसाठी मंगळवारी प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह १६ नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी झालेल्या नगरपंचायतीला सभेला माजी नगराध्यक्षा आणि पारकर समर्थक अ‍ॅड. प्रज्ञा खोत अनुपस्थित होत्या.विषय समिती सदस्य निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेला उपस्थित नसलेल्या नगरसेवकांना या प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी मागणी करतानाच गेल्या वेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्यावेळी वेगळा नियम आणि आता कायदा बदलला का? असा प्रश्नही काँग्रेस नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांवर आठ महिन्यात त्यांच्या गटातील नगरसेवक अविश्वासच दाखवत आहेत. असा टोला लगावतानाच माजी नगराध्यक्षा प्रज्ञा खोत सभेला अनुपस्थित रहात आहेत. असे का? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. गेल्यावेळी काँग्रेसचा गट अधिकृत असताना तो का नाकारण्यात आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व सत्ताधारी पारकर गटाला काँग्रेसचे नगरसेवक समीर नलावडे, गणेश हर्णे, अभिजित मुसळे यांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.त्यावर कन्हैया पारकर म्हणाले, १३ जणांचा गट अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रत्येक समितीत दोन-दोन सदस्य घेऊन आपण समित्या गठीत करुया. मात्र, पारकरांचे म्हणणे नाकारत आम्ही आठ नगरसेवकांचे पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दिल्याचे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.१३ सदस्यांचा काँग्रेसचा गट अधिकृत नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सभा तहकूब न करता चिठ्ठीद्वारे नगराध्यक्ष वगळता १२ नगरसेवकांमधून समिती सदस्य निवडण्यात आले. २६ आॅगस्टला या समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित समिती सदस्य उपस्थित राहिले तरच त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेच्या वेळी एखादा सदस्य अनुपस्थित राहिल्यास सदस्य निवड प्रक्रियेत कोणतीही अडचण येत नसल्याचे निवडणूक अधिकारी संतोष भिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) नव्याने गठीत झालेल्या समित्यामहिला व बालकल्याण समिती : सुविधा साटम (काँग्रेस), प्रज्ञा खोत (पारकर गट), सुमेधा अंधारी (पारकर गट), नंदिनी धुमाळे (शिवसेना), बांधकाम-पर्यटन समिती : गौतम खुडकर (काँग्रेस), अभिजित मुसळे (काँग्रेस), किशोर राणे (काँग्रेस), मेघा गांगण (काँग्रेस), राजश्री धुमाळे (भाजप), आरोग्य समिती : किशोर राणे (काँग्रेस), मेघा गांगण (काँग्रेस), प्रज्ञा खोत (पारकर गट), राधाकृष्ण नार्वेकर (पारकर गट), सुशांत नाईक (शिवसेना), वित्त व पाणीपुरवठा : पदसिद्ध उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर (पारकर गट), मेघा गांगण (काँग्रेस), गणेश हर्णे (काँग्रेस), गौतम खुडकर (काँग्रेस), नंदिनी धुमाळे (शिवसेना) अशा सदस्यांची चिठ्ठीद्वारे १२ नगरसेवकांमधून निवड करून समित्या गठित करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीतकेवळ सेना-भाजपचाच अधिकृत गट