शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

शेतकऱ्यांच्या नावावर बियाणे खरेदी करून फसवणूक

By admin | Updated: June 11, 2015 00:24 IST

सतीश सावंत : स्थायी समिती सभेत आरोप

ओरोस : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्ह्यात मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर मोफत बियाणे खरेदी करून दुसऱ्या शेतकऱ्यांना विकण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सतीश सावंत यांनी केला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, रणजित देसाई, अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे, सतीश सावंत, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, रेवती राणे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी संबंधित विभागच शेतकऱ्यांच्या नावावर मोफत बियाणे खरेदी करून अन्य शेतकऱ्यांना विकत असल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी सभेत उपस्थित केला, तर संबंधित विभागाची चौकशीची मागणी केली. तसेच यापुढे ज्याठिकाणी मोफत बियाण्यांचे वाटप होत असेल त्याठिकाणी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन बियाण्यांचे वाटप करावे, असे आवाहन सतीश सावंत यांनी स्थायी समिती सभेत केले.या सभेत विद्युत प्रकरणाबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १६ मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी पंपांना वीज जोडणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सद्यस्थितीत एकाही कृषीपंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करत कृषी पंपांना त्वरित वीज जोडणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.जिल्ह्यात ५५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी सुमारे २२ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र शासनाकडून अनुदानच उपलब्ध न झाल्याने काही कामे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे सुमारे २२ कोटींची कामे पूर्ण केलेले ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडल्याची माहितीही सभेत देण्यात आली. (वार्ताहर)जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलीयाबाबत बुधवारी सभागृहात आरोग्य विभागावर नाराजीचा सूर उमटला. जिल्ह्यात कुठेही आरोग्य सेवा उत्तमरित्या मिळत नाही. तसेच संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी माहिती सभेत सर्व सदस्यांनी उपस्थित केली असता जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांना २२ जून रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी केल्या आहेत.