शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे पथक केरमध्ये ; नमुने तपासले

By admin | Updated: January 25, 2016 23:28 IST

योगेश साळे यांची माहिती : जनतेने घाबरुन जाऊन नये ; तातडीने उपचार घ्या

 सिंधुुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील दोन रूग्णांना कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (माकडताप) या प्रकारचा ताप आल्याने त्यांना गोवा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका रूग्णाला या प्रकारचा ताप असल्याचा अहवाल गोव्यातील रूग्णालयाने जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत पुणे येथील एका पथकाने केर येथील १७ संशयीतांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यांचा अहवाल पुणे येथुनच प्राप्त होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांंनी सांगितले. सध्या केर गावात कॅसनूर फॉरेस्ट डिसीज या आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. हा विषाणूजन्य आजार असून गोचीड चावल्यामुळे हा आजार बळावतो. त्यामध्ये उंदीर, माकडे व पाळीव प्राणी यांचा समावेश आहे. माणसाला हा आजार गोचीड चावल्यामुळे तसेच जंतुसंसर्ग प्राण्यांच्या सहवासात राहिल्यामुळे किंवा आजारी मृत माकडांच्या सानिध्यात राहिल्यामुळे होतो. केर गावातील दोघांना या प्रकारचा ताप आल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते. त्यांचे नमुने घेतले असता त्यातील एक रूग्णामध्ये माकडतापाचे विषाणू असल्याचे आढळून आले. तर एका रूग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे पुणे येथील एका पथकाला या या गावात पाचारण करून १७ संशयितांचे रक्त नमुने घेण्यात आले. यावर तपासणी करून पुणे येथुन अहवाल प्राप्त होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.जोशी यांनी सर्व विभागांना जबाबदाऱ्या देत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत. झेंडावंदनाचे कार्यक्रम झाल्यावर पालकमंत्री दीपक केसरकर केर गावची भेट घेणार असून आरोग्य यंत्रणेला पूर्णपणे सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या गावात आढळणाऱ्या रूग्णांवर येथेच उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. जनतेने घाबरून न जाता ताप आल्यास तातडीने नजीकच्या शासकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. (प्रतिनिधी)