शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी स्थगित

By admin | Updated: April 7, 2015 01:27 IST

पाटील यांचा आदेश : बचाव समितीचा लढा काही अंशी यशस्वी

वेंगुर्ले : वेंगुर्ले-मठ येथील सासवण मिनरल्स अ‍ॅण्ड केमिकल प्रा. लि. यांच्या सिलिका सॅण्ड उत्खननाबाबत पर्यावरण विषय जनसुनावणी मठ येथे ८ एप्रिल रोजी ठेवली होती. परंतु या जनसुनावणीला मराठी भाषेतील पर्यावरणविषयक आघात मूल्यांकन अहवालात उपलब्ध करून दिले नसल्यामुळे जनसुनावणी स्थगित करण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. भ. ना. पाटील यांनी सोमवारी दिला. त्यामुळे गेले काही दिवस बचाव समिती व ग्रामस्थ यांचा लढा काही अंशी यशस्वी झाला आहे. सासवण मिनरल्स अ‍ॅण्ड केमिकल्स प्रा. लि. मुंबई यांच्या मठ सतये वेंगुर्ले येथे ३१.७६५ हेक्टर मायनिंग लिजपैकी १९.१४ हेक्टर क्षेत्रावर वाळूचे उत्खनन करण्यासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी ८ एप्रिल रोजी मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, रत्नागिरी यांनी आयोजित केली होती. मात्र, या प्रकल्पामुळे वेंगुर्ले निशाण तलावातील पाण्याचा उद्भव नष्ट होणार असल्याबाबत वेंगुर्ले तालुका निशाण तलाव बचाव समितीने पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, रत्नागिरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार करून प्रकल्प रद्द करावा. या बैठकीस पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, बचाव समितीचे सचिव डॉ. प्रदीप जोशी, माजी सरपंच महेश धुरी, तसेच शिवसेना पदाधिकारी सचिन वालावलकर, पर्यावरण विभागाचे संचालक पाटील, जिल्हाधिकारी आदी उपस्थित होेते. यावेळी पर्यावरणमंत्र्यांनी जनसुनावणी स्थगित द्यावी, असे आदेश दिले. पाटील यांनी जनसुनावणीस स्थगिती दिली.स्थगिती मिळण्याकरिता वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, सचिन वालावलकर यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. (वार्ताहर)पर्यावरण मंत्र्यांच्या दालनात बैठकप्रस्तावित प्रकल्पात सिलिका सॅण्ड उत्खननाच्या प्रकल्पाबाबतचा मराठी भाषेतील पर्यावरणविषयक आघात मूल्यांकन अहवाल उपलब्ध करून दिला नसल्याने याबाबत जनतेला प्रकल्पाची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. याच मुद्यावर आज मुंबई मंत्रालयात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा अहवाल रद्द करावा व मराठी भाषेतील पर्यावरणविषयक आघात मूल्यांकन अहवाल उपलब्ध करावा व जनसुनावणी रद्द करावी, या मुद्यावर मठ सतये वेेंगुर्ले निशाण तलाव बचाव समितीने जोरदार मुद्दा उचलून धरला.