शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लोकदबावाने भूमिका बदलू शकते

By admin | Updated: September 24, 2015 00:12 IST

संजय देशमुख : इको - सेन्सिटिव्ह, प्रदूषणकारी प्रकल्पाबाबत मांडली भूमिका

सावंतवाडी : इको - सेन्सिटिव्ह लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. लोकांना काय हवे आणि काय नको हे जर माहीत नसेल, तर त्याचा काय फायदा? इको-सेन्सिटिव्हचा पुनर्विचार करीत असताना लोकदबावामुळे अजूनही इको-सेन्सिटिव्हबाबत सरकार भूमिका बदलू शकते, असे स्पष्ट मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मंगळवारी येथील पंचम खेमराज महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर स्पष्ट मते मांडली. त्यांच्यासोबत कुलसचिव खान, ‘सिंधुस्वाध्याय’चे प्रमुख विनायक दळवी उपस्थित होते.कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे महाविद्यालयाच्यावतीने राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी स्वागत केले. यावेळी शुभदादेवी भोसले, प्राचार्य दिलीप भारमल, अ‍ॅड. सुभाष देसाई, अ‍ॅड. प्रमोद प्रभूआजगावकर आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे; मात्र, त्याचा म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अमूल्य खजिना नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करणारा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे इको-सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली आहे. एखाद्या समितीला जबाबदारी देऊन सुमारे साडेचार हजार किलोमीटर परिसराचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर इको-सेन्सिटिव्ह राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याठिकाणी असणारी विपुल संपत्ती लक्षात घेता गावागावात जाऊन याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.इको-सेन्सिटिव्हबाबत अद्यापही वेळ गेली नसून मीडिया तसेच लोकदबावामुळे आपण आताही इकोसेन्सिटिव्हबाबत सरकार वेगळा निर्णय घेऊ शकते. एखाद्या ठिकाणी जैवविविधता आहे, म्हणून तो गाव सरसकट इको-सेन्सिटिव्ह करावा या मताचा मी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)+परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, अनेक विभागातील परीक्षा विभाग हे विद्यापीठाचे असून गेली अनेक वर्षे या विभागात काम करणारे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे विविध पदे भरणे गरजेची आहेत. ती पदे शासन आता भरणार असून परीक्षांबाबत काही वेगळे निर्णय घ्यायचे आहेत. ते नक्की घेऊ. यापुढे कोणताही गैरप्रकार टाळता येईल असेच काम करून आम्ही दाखवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तळेरे येथील मॉडेल कॉलेजच्या जागेचे हस्तातंरण झाले असून हे मॉडेल कॉलेज येत्या चार वर्षात उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा म्हणावा तसा अभ्यास नाही.इको - सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली.शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे.गावागावात जाऊन अभ्यास होणे गरजेचे आहे.