शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मांसल पक्षी उपलब्ध करून देण्यासाठी २४ लाखांची तरतूद

By admin | Updated: September 4, 2016 00:33 IST

उर्वरित पैशांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेने कर्ज योजना अमलात आणली आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदने पाच लाख रुपयांची तरतूद

ओरोस : सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे एकच अंडी उबवणी केंद्र आहे. पाच जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात येथे पिल्लांची मागणी असते. मागणी प्रमाणे पुरवठा करणे या केंद्राला शक्य होत नाही. त्यामुळे गतवर्षी आपल्याला कुक्कुट पालन योजनेअंतर्गत मांसल पक्षी पुरविण्यात हे केंद्र असमर्थ ठरले होते. तसे लेखी पत्रही या केंद्राने दिले असून, गेल्या वर्षीची मागणी यावर्षी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी पशुधन विभागाने गेल्या वर्षीचे १२ लाख व यावर्षी १२ लाख अशी मिळून २४ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने या केंद्राकडून वेळोवेळी मांसल पक्षी उपलब्ध करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रभारी जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. व्ही. एफ. देसाई यांनी पशुधन व दुग्ध व्यवसाय समितीच्या सभेत सांगितले. समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष तथा समिती सभापती एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, वेंगुर्लेच्या सभापती सुचिता वजराठकर यांसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले की, जिल्हा परिषदेने अंड्यावरील पक्षी देण्याची योजना आखली आहे. एका लाभार्थ्याला १६ आठवड्यांची ३०० पिल्ले देण्यात येणार आहेत. याकरिता पिंजरा, खाद्यपदार्थ मिळून एक लाखाचा खर्च अपेक्षित आहे. यातील २० हजार रुपये अनुदान पशुधन विभागाच्यावतीने देण्यात येणार आहे. उर्वरित पैशांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेने कर्ज योजना अमलात आणली आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदने पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. यातून किमान २५ लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. पक्षासाठी ५६ हजार रुपये, पिंजऱ्याकरिता ३६ हजार रुपये अशा प्रकारे खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून पुढील तीन वर्षांत कुक्कुटपालन व्यवसाय रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे डॉ. देसाई म्हणाले. (वार्ताहर)