शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांचे उपोषण अद्याप सुरुच

By admin | Updated: December 10, 2014 23:45 IST

एकाची प्रकृती ढासळली : सुरक्षा अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट, आंदोलनाचा तिसरा दिवस

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील एजन्सी नोंदणीकृत नसल्याने कायमस्वरुपी नोकरी असूनही नोकरी न मिळाल्याने वीस सुरक्षारक्षकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते. यातील रवींद्र साळवी या उपोषणकर्त्या सुरक्षारक्षकाची प्रकृती ढासळली. रत्नागिरीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. कुडाळ येथील सुरक्षारक्षकांचा लढा अजूनही सुरुच आहे. या उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशीही या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासन आणि उपोषणकर्ते दोन्हीही आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने उपोषण अजूनही सुरुच आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ते सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षारक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षारक्षकांसमोर कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी आमची सुरक्षारक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (प्रतिनिधी)प्रकृती ढासळलीउपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील रहिवासी रवींद्र साळवी (वय ४५) यांची प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांची निव्वळ चर्चाउपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी रत्नागिरी येथील सुरक्षा अधिकारी संदेश अहिरे आले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांचे नेते काका कुडाळकर, संजय भोगटे, बंड्या सावंत, किरण शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय वरिष्ठांचाच असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एमआयडीसी उपअभियंता रेवणकर हेदेखील उपस्थित होते. मात्र, या चर्चेअंती कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत नोकरीत सामाविष्ठ करुन घेतले जात नाही तोपर्यंत लढत राहण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे.