शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

केर पुलावर संरक्षक कठडे आवश्यक

By admin | Updated: May 22, 2014 01:01 IST

ग्रामस्थांतून होत आहे मागणी

 दोडामार्ग : केर गावच्या नदी पुलावरील वाहून गेलेले संरक्षक कठडे पावसाळयात अधून- मधून पुलावरुन पाण्याचा प्रवाह चालूच असतो. गतवर्षी पावसाच्या तडाख्यामुळे पुलावरील संरक्षक कठडे पूर्णपणे वाहून गेले आहेत. व काही प्रमाणात मोडकळीस आलेले आहेत. गावात या पुलावरुन एसटीच्या जवळपास आठ फेर्‍या व अन्य खाजगी वाहनांची वर्दळही बर्‍याच प्रमाणात असते. सदर पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून संरक्षक कठडे न घातल्यास भविष्यात वाहतुकीस धोका संभवू शकतो. त्यामुळे संबधित विभागाने याकडे वेळीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) काजू नुकसानीचीही भरपाई मिळावी बागायतदार शेतकर्‍यांची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्‍यांचे वर्षांचे आर्थिक समीकरण सांभाळणार्‍या काजू उत्पादनाला बदलत्या वातावरणाचा फटका व आठवड्यापूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यावर्षी केवळ ४० टक्के उत्पन्न शेतकर्‍यांच्या पदरी आले आहे. त्यामुळे झालेल्या ६० टक्के नुकसानीची आंब्याप्रमाणेच काजू उत्पादनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. तालुक्यात आंबा, भात, कोकम या पिकाखाली क्षेत्र असले तरी त्यांच्या तुलनेत काजू बागायतीखाली बरेचसे क्षेत्र आहे. येथील शेतकरी काजू उत्पादनावर आपल्या वर्षभराच्या पोटगी करत असतात. दरवर्षीच्या तुलनेत काजूला भाव ही चांगला होता. आणि त्याप्रमाणात बाजारपेठही उपलब्ध आहे. उन्ह, सावलीच्या खेळाला बदलत्या वातावरणाला काजू पिके बळी पडले त्याचप्रमाणे काजू उत्पादनही पूर्णपणे घटले आहे. गतवर्षी तालुक्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते पण त्याप्रमाणात त्याला भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात होता पण यावर्षी काजूला भाव चांगला असला तरी उत्पादनात मोठ्या प्रमाधात घट झाल्याचे दिसते. दरवर्षी ७० ते ८० टक्के उत्पादन असणार्‍या काजू पिक यावर्षी ४० टक्के झाले आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष्र वेधून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वर्षभर शेतकर्‍यांना आर्र्थिक स्थिरता देणार्‍या या काजू पिकाबाबत यावर्षी कमालीची नाराजी बागायतदार शेतकर्‍यांत आहे. बागायतीसाठी घातलेले भांडवलही यावर्षी वसुल झाले नसल्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा यावर्षीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे कमी उत्पादनाअभावी झालेला तोटा लक्षात घेऊन शासनस्तरावरुन काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काजू बागायतदारांतून होत आहे. (प्रतिनिधी)