शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

दहा हजार सुकन्यांची समृद्धी

By admin | Updated: May 29, 2015 00:08 IST

भारतीय टपाल खाते : जिल्ह्यात मिळतोय उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : भारतीय टपाल खात्याने ० ते १० वर्षांच्या आतील बालिकांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ अल्पबचत योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १०,५०० बालिका या योजनेचा लाभ घेत आहेत.बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल खात्यातर्फे २२ जानेवारीपासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ १ ते १० वर्षांच्या आतील बालिकांना मिळतो. योजनेची सुरूवात म्हणून एक वर्ष विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार यावर्षीच फक्त २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे हे खाते खोलता येणार आहे. सुरुवातीला १००० रूपये भरून खाते उघडता येईल. एका आर्थिक वर्षात कमीत कमी १००० रूपये किंवा जास्तीत जास्त १,५०,००० एवढी गुुंतवणूक करता येईल. खाते उघडल्याच्या तारखेपासून चौदा वर्षे होईपर्यंत या खात्यात पैसे भरावे लागतील. आर्थिक वर्षात किमान १००० रूपये जमा न झाल्यास खाते अनियमित होईल. मात्र, असे झाले तरीही ५० रूपये भरून खाते पुनरूज्जीवित करता येते. तसेच ही गुंतवणूक कर कपातीसाठीही पात्र धरण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनची आवश्यकता भासणार नाही. मात्र, या योजनेचा दोन मुलींसाठीच घेता येणार आहे. या गुंतवणुकीवर ९.२ टक्के इतक व्याजदरही मिळणार आहे. ‘सुकन्या समृद्धी खाते’ या योजनेचा लाभ सामान्य पालकांना घेता येणे शक्य आहे. तसेच हे खाते एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरीत करणेही सहज शक्य आहे. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्चत्तम शिक्षण आणि विवाह यासाठी ५० टक्के रक्कम काढता येईल, तसेच २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येईल.१० वर्षांपर्यंतच्या बालिकांसाठी अतिशय उत्तम अशी ही योजना असल्याने आता जिल्ह्यातून याला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे केवळ चार महिन्यातच १०,५०० बालिका या योजनेचा लाभ घेत आहेत. यापुढेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पालकांनी पुढे यावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक बी. आर. सुतार यांनी केले आहे. देशात या योजनेसाठी बरेच प्रयत्न सुरू झाले असून अनेक ठिकाणी विशेष मोहीम राबविली जात आहे. देशभरात या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)