शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

‘महानिर्मिती’विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

By admin | Updated: September 22, 2015 23:55 IST

फसवणुकीचा आरोप : वयोमर्यादेमुळे प्रशिक्षणार्थी घरी

शिरगाव : महानिर्मिती कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झालेली आहे. आज आपण कामावर केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून आहोत. शासन निर्णयानुसार उद्या वयाचे कारण सांगून घरी पाठवण्यात येतील. त्यामुळे या अन्यायाविरुध्द न्यायालयात जाण्याचा इशारा सेवासमाप्ती केलेल्या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.महानिर्मिती कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. जलसंपदा खात्यामार्फत पन्नास वर्षांपूर्वी जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना दाखला दिला. नोकऱ्या मिळाल्या नाहीत म्हणून वारंवार संघर्ष केल्यावर प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल केले. त्यावेळी दिलेल्या पत्रात आपणास सेवेत घेईपर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणून राहावे लागेल, अशी स्पष्ट सूचना आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपण आयुष्यभर प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहावे काय? असा सवाल केला आहे.तथापि ३ वर्षांहून अधिक काळ गेल्यानंतर ४५ वर्षे झाली. यापुढे सेवेत घेता येणार नाही, असे सांगून मूळ कागदपत्र स्वत:कडे ठेवून सेवासमाप्तीची नोटीस कंपनीने दिली आहे. अनेक ठिकाणी साकडे घातल्यानंतर याबाबत शासन कोणताच निर्णय देत नसल्याने यापुढे महाराष्ट्रात अशा उमेदवारांना वयोमर्यादा ४५ वर्षे झाल्यावर घरी जावे लागणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. जमिनी विकूनही नोकरी नाहीच, उलट प्रशिक्षणार्थी म्हणून मिळालेली संधीही काढून घेण्यासाठी ही चाल असल्याचा आरोप होत आहे.केवळ प्रशिक्षण २००० ते ६००० पर्यंत विद्यावेतन देऊन प्रकल्पग्रस्तांना घरी पाठवणे हा अन्याय असल्याची भावना अलोरे पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. महाजनकोतील मान्यताप्राप्त संघटनांनी आजवर त्यांच्यासाठी आम्ही लढा देत असल्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणताच सकारात्मक निर्णय झालेला नाही. (वार्ताहर)न्यायालयात जाण्याचा इशारावयाचे कारण सांगून कोणत्याही क्षणी कामावरुन कमी करण्याची भीती.अन्यायाविरुध्द न्यायालयात जाण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा.जलसंपदा खात्यातर्फे पन्नास वर्षांपूर्वी जमिनी खरीदल्याचा दाखला.वारंवार संघर्ष केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी.सेवेत घेईपर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहावे लागणार, कंपनीच्या पत्रात सूचना.