शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हल्ल्याचा पुरोगामी संघटनांकडून निषेध

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

सावंतवाडीत कार्यक्रम : हल्लेखोर लवकर पकडण्याची मागणी

सावंतवाडी : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर सोमवारी सकाळी भरदिवसा कोल्हापूर शाहूनगरीत अज्ञातांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा बुधवारी सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील पुरोगामी विचारधारेच्या संघटनांमार्फत सावंतवाडी येथील केशवसूत कट्टा येथे निषेध करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. संदीप निंबाळकर, ज्येष्ठ समाजवादी गोपाळराव दुखंडे, महेश परुळेकर, हरिहर वाटवे, प्रा. प्रवीण बांदेकर, मधुकर मातोंडकर, आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, पुरोगामी विचाराच्या माणसांना संपविण्याचे काम हल्लेखोर करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना फोनवरून अनेक धमक्या येत असत. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनाही अशाचप्रकारे फोन येत असत. यानंतर त्यांचाही गोळ्या घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोघांनी टोलविरोधात लढा उभा केला होता. तसेच ते श्रमिक कष्टकरी कामगारांचे पुढारी म्हणून कार्यरत होते. समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या अशा नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे अशा हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.डॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यादेखील या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्या व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथे आणणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. निंबाळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)