शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मोदी शासनाचा निषेध

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन : ‘अच्छे दिन’ची पहिली पुण्यतिथी साजरी

कणकवली : केंद्रातील मोदी शासनाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या शासनाने गेल्या वर्षभराच्या कालावधीत जनतेचा भ्रमनिरास केला आहे, असा आरोप करीत त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील काँग्रेस कार्यालयासमोर मंगळवारी मोदी शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पहिली पुण्यतिथी साजरी केली. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपा तसेच त्यांच्या मित्रपक्षांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. सत्तेत आल्यानंतर डिझेल, पेट्रोल, गॅस स्वस्त करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्यात येईल. परदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणण्यात येईल, चीनला वठणीवर आणण्यात येईल अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येवून एक वर्षाचा कालावधी लोटला तरी मोदी शासनाला जनतेला दिलेली वचने पूर्ण करता आलेली नाहीत. असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने मोदी शासनाचा प्रतिकात्मक निषेध मंगळवारी करण्यात आला.यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, कणकवली उपनगराध्यक्ष समीर नलावडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, चांदजी राणे, संजय मालंडकर, विजय भोगटे, राजेश रावराणे, मिलिंद मेस्त्री, उत्तम सावंत आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मोदी शासनाच्या अच्छे दिनच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून पहिली पुण्यतिथी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यातआली. (वार्ताहर)