शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृतीसाठी ‘स्वच्छंद’ सारखे कार्यक्रम व्हावेत-- ए. डी. कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:12 IST

खारेपाटण : भारताचे माजी राष्टÑपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून शासनाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देखारेपाटण महाविद्यालयात ‘स्वच्छंद’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कखारेपाटण : भारताचे माजी राष्टÑपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून शासनाने जाहीर केला आहे. मराठी साहित्याच्या वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्यातून प्रेरणा मिळण्यासाठी स्वच्छंदसारखे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे, असे मत खारेपाटण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी व्यक्त केले.

गो. वि. तथा विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडविणारा ‘स्वच्छंद’ कार्यक्रम खारेपाटण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘स्वच्छंद’ या कार्यक्रमाचे चौथे पुष्प रविवारी खारेपाटणमध्ये सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका योगिनी रानडे, पर्यवेक्षक विलास फराकटे, एन. टी. शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सादरीकरण वामन पंडित, माधव गावकर, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्या गौरी यांनी केले. यावेळी विंदा करंदीकरांच्या ‘माझ्या मना दगड बन’, ‘तेच ते’ ‘चेडवा ये गो माझ्या घरी’ ‘नाचा भावय’ ‘मुक्ती मधले मोल हरवले’, ‘माळ्यावरचा ट्रंक’ आदी महत्त्वाच्या कवितांचे संगीतबद्ध वाचन करण्यात आले.

प्राचीन ओव्यांचे रूपांतर अर्वाचिन साहित्यात करण्यात विंदा यांचे योगदान आहे. साठीची गझल देखील रसिकांची दाद घेऊन गेली. आरती प्रभू यांच्यातील आरतीची गझल देखील सादर करण्यात आली. भारतीय मराठी साहित्याचे विरुपीकरण करणारी ‘विरुपिका, ‘कर कर करा-मर मर मरा’ या कविता वाचून दाखविण्यात आल्या.तसेच करंदीकरांच्या बालकवितांचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात, प्रा. शोभा देसाई यांनी केले, तर स्वच्छंद कार्यक्रमाचे निवेदन वामन पंडित यांनी केले.खारेपाटण येथील महाविद्यालयात ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम वामन पंडित यांनी सादर केला. यावेळी अनिल फराकटे, विद्या गौरी, प्रसाद घाणेकर, माधव गावकर आदी उपस्थित होते.